पुणे – :- २०-२२ वर्षापूर्वी पुण्याच्या डॉ. वेंकटेश वांगवाड यांनी निर्मित केलेला टेनीस व्होलीबॉल या खेळाची पहीली अशीयाई स्पर्धा होत आहे हे या खेळासाठी अश्वासक पाऊल आहे असे अखील भारतीय विद्यापीठाचे क्रीड़ा चेयरमन एम.एम. सालुंखे यांनी संगितले. बालेवाडीच्या छत्र पती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजीत पहिल्या एशियायी टेनीस व्होलीबॉल स्पर्धाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते
या स्पर्धचे उदघाटन झाले. याप्रसंगी गणपतराव बालवडकर, क्रीड़ा उपसंचालक अनिल चोरमले, क्रीड़ा संचालाक बालाराम हिमालयीन, भारतीय फेड रे शन चे अध्यक्ष भगवान पेद्दावार, या खेळाचे जनक डॉ. व्यकंटेश वंगवाड़ आदी मान्यवर उपस्थीत होते.
या स्पर्धेत पुरुषामध्ये यजमान भरतासह, श्रीलंका, बंगला देश, मलेशिया, नेपाळ, इराण, मालदीव, भूतांन, म्यानमार, थाईलैंड, जापान, साउथ कोरिया इराक आणि
आफगानीस्थान तर महीलामध्ये नेपाळ, श्रीलंका, भूतांन आणि भारत या संघानी सहभाग घेतला.
उदघाटनानंतर लीगचे सामने खेळले गेले . भारताच्या पुरुषाच्या संघाने साखलीत अनुक्रमे थायलंड, श्रीलंका, आणि अफगानीस्थान यांचा पराभव करुन बाद फेरीत प्रवेश केला. तर नेपाळ, भूतांन, बंगला देश आणि थाईलंडया संघानीही साखली सामने जिंकून बाद फेरीसाठी आपली दावेदारी कायम राखली.
महीलामध्ये रऊड रॉबिन पद्धतीने खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताच्या संघाने अनुक्रमे भूतान आणि श्रीलंका संघाचा पराभव करुन विजेतेपदाकड़े अश्वासक वाटचाल केली आहे. भारताकडून खेळताना प्राची कड़णे, अनुष्का पुजारी, साक्षी बुरक, खुशी शुक्ला, यांनी भारताच्या संघसाठी चांगला खेळ करुन विजेतेपदाकड़े आश्वासक पाऊल टाकले.
पुरुषामध्येही भारताच्या प्रफुल बनसोड़, राहुल पेटकर, हर्ष अमीन, ऋषीकेश बैक्रे, शिवा प्रसाद, शुशांत परिदा, ऋत्विक सुन्दर यांनी आपल्या दोंनही सामन्यात एकेरी आणि दुहेरीमध्ये विजय मिळवत बाद फेरीत आपल्या संघाला बाद फेरीत जाण्यासाठी चांगली कामगारी केली.
या स्पर्धाला गुजरात क्रीड़ा विभागाच्या प्रमुख हेतल गांधी, एअर फोर्सचे अधीकारी आणि व्हो ली बॉल चे राष्ट्रीय खेळाडू मधुसूदन क्षीरसागर, अरुण शर्मा, स्नेहा शर्मा, सी. बी एस.सी. चे क्रीड़ा प्रमुख अरुण शर्मा,
श्रीमती शैला कुरीयन आदीनी भेट देवुन खेळाडू आणि ओजाकंना शुभेछया दिल्या.
आज झालेल्या स्पर्धेचे निकाल-
पुरुष :- साखली सामने-
१) भारत विजयी विरुद्ध श्रीलंका ( २-०)
१) जपान विजयी विरुद्ध साउथ कोरिया ( २-१)
३) अफगानीस्थान विजयी विरुद्ध इराक ( २-१)
४) भारत विजयी विरुद्ध जपान ( २-०)
५) थाईलैंड विजयी विरुद्ध इराक ( २-०)
६) जपान विजयी विरुद्ध अफगानीस्थान ( २-०)
महिला विभाग –
१) भारत विजयी विरुद्ध श्रीलंका ( २-०)
२) नेपाळ विजयी विरुद्ध भूतांन (२-१)
३) भारत विजयी विरुद्ध भुतान ( २-०)
४) नेपाळ विजयी विरुद्ध श्रीलंका ( २-०)





