नाशिक : नाशिक जिल्हा ऍथलेटिकस अँथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक २४ डिसेम्बर, २०२२ रोजी ज्युनियर गटाच्या नाशिक जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये १६ वर्षे आतील मुले- मुली आणि १४ वर्षे आतील मुले- मुली या दोन वयोगटाचा समावेश आहे. या स्पर्धेचे आयोजन स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथील सिंथेटिक ट्रॅकवर होणार आहे. या स्पर्धेत रॅंनिंग, थ्रोइंग आणि जंपिंग याचबरोबर हॅपटेंथलॉन आणि डिकेथलॉन या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धाचे आयोजन ऑल इंडिया ऍथलेटिकस असोसिएशन आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार होणार आहेत.
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे या दोन गटांच्या खेळाडूंची नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक १२ ते १४ जानेवारी, २०२३ दरम्यान पाटणा. बिहार येथे आयोजित १८ व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
तरी नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे अवाहन नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे चेअरमन हेमंत पाटील आणि सचिव सुनील तावरगीरी यांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खेळाडूंनी साई स्पोर्ट्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, विजेंद्र सिंग, वैजयंत काळे, संदीप फुगट यांच्याशी संपर्क करावा.






