” ए. बी. एच. गोल्फ कप – २०२३ ” स्पर्धांचे आयोजन

Jan 11, 2023

व्यवसायीक खेळाडूंसोबत नवोदित, महिलां आणि मुलानांही संधी

नाशिक   :  निफाड़ तालुक्यामध्ये .विंग कमांडर ( रिटा ) प्रदीप बागमार  यांनी निफाड येथे त्यांच्या २० एकर जागेत भव्य असे  गोल्फ कोर्स (मैदान) तयार केले आहे. रिव्हर साईड गोल्फ कोर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या  या गोल्फ कोर्सवर चवथ्या खुल्या गटाच्या  ” ए. बी. एच.  गोल्फ कप – २०२३ ”  स्पर्धांचे आयोजन दिनांक १४ आणि १५ जानेवारी, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे.
भारतीय गोल्फ  युनियनच्या मार्गदर्शनाखाली  आणि गोल्फ असोसिएशन, जिल्हा नासिक यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे  आयोजन करण्यात आले आहे.
पहिला गट हा व्यावसायिक खेळाडूंसाठी असणार आहे. दुसरा अमॅचुअर गट असणार आहे,  तर तिसरा नवोदितांसाठी (Novice ) असणार आहे. आणि  महिलांना आणि लहान  मुलांना संधी मिळावी यासाठी   महिलांसाठी वेगळा गट आणि लहान  मुलांसाठी वेगळा गट असणार आहे.
 या संर्धेत  ७० खेळाडूचा सहभाग अपेक्षित आहे.यामध्ये  हैद्राबाद, मुंबई , ठाणे, पुणे औरंगाबाद  तसेच मिलिटरी फोर्समधील खेळाडूंचा सहभाग असणार आहे.  या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळवलेल्या दर्जेदार खेळाडूंचा समावेश अपेक्षित आहे.
 १४ जानेवारी रोजी सकाळी ०७. ३० वाजता या स्पर्धेचे औपचारिक उदघाटन होणार असून त्यानंतर लगेचच स्पर्धेला सुरवात होणार आहे.
 रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे ९ (नऊ ) होलची सुविधा आहे. या स्पर्धेत व्यावसायिक स्पर्धकांना या ९ हॉलचे दोन राऊंड्स पूर्ण करावे लागणार आहेत. तर अमेच्युएर गटातील खेळाडूंनाही ९  हॉलचे दोन राऊंड्स खेळावे लागणार आहेत.
 नवोदित खेळाडूसाठी १८ होल्स खेळतांना बेस्ट परफॉर्मन्स बघून विजेता ठरवण्यात येणार आहे.
तर महिलांकरिता आणि मुलांकरिता लॉंग डिस्टन्स शॉट, पीन जवळ मारलेला शॉट  आणि  सेंटर लाईन जवळ मारलेला शॉट असे प्रकार असणार आहेत.
 या स्पर्धेची तंत्रीक बाजू  योग्य रीतीने हाताळण्यासाठी  तांत्रिक समिती काम करणार आहे. याचबरोबर या स्पर्धेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सर्व गटामध्ये  विजेता,  उपविजेता आणि तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी ए. बी. एच डेव्हलपर्स ग्रुप, मेक वर्ल्ड,  बी. एल . व्ही. डी. रिसॉर्ट  ग्रुप, जी. सी. एस. – एम. ए. आय. ग्रुप, डिकेथलॉन ग्रुप  यांचे सहकार्य लाभले आहे.
 या स्पर्धाच्या आयोजनाकरीता  विंग कमांडर प्रदीप बागमार, राजीव देशपांडे,  नितीन हिंगमिरे,  आशिष केरोसिया आणि  सहकारी प्रयत्नशील आहेत.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी या स्पर्धेचे प्रमुख विंग कमांडर प्रदीप बागमार [रिटा .] मोबाईल नंबर ९४२२७०४६१४ आणि  जिल्हा सचिव नितीन हिंगमिरे  मोबाईल नंबर ९४२०००२२४४ यांच्याशी  संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News