६३ खेळाडूंचा सहभाग. व्यवसायीक खेळाडूंसोबत महिलां, नवोदित आणि मुलानांही संधी
नाशिक : निफाड़ येथे .विंग कमांडर ( रिटा ) प्रदीप बागमार यांनी निफाड त्यांच्या २० एकर जागेत भव्य असे गोल्फ कोर्स (मैदान) तयार केले आहे. रिव्हर साईड गोल्फ कोर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोल्फ कोर्सवर चवथ्या खुल्या गटाच्या ” ए. बी. एच. गोल्फ कप – २०२३ ” स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय गोल्फ युनियनच्या मार्गदर्शनाखाली आणि गोल्फ असोसिएशन, जिल्हा नासिक यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पुरुषांसाठी अमॅचुअर गट, आणि नवोदितांसाठी (Novice) गट आहे. तर महिलांसाठी अमॅचुअर गट, आणि मुलांना संधी मिळावी यासाठी मुलांसाठी वेगळा गट अश्या चार गटात या स्पर्धां खेळविल्या गेल्या. या संर्धेत ६३ खेळाडूनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे उदघाटन ए. ओ. सी. इ. डी. देवळालीचे एअर कमोडोर प्रदीप नायर यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ए. बी. एच डेव्हलपर्स ग्रुपचे श्री अटल. श्री बागमार आणि श्री हंसवानी तसेच मेक. वर्ल्डचे ध्रुवेन शहा यांनी शुभेछया दिल्या.
या स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंसोबत मुलांच्या गटात १२ स्पर्धकांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला यामध्ये नाशिकच्या खेळाडूंसोबत मुंबईच्या सात खेळाडूंचा समावेश आहे.
रिव्हर साईड गोल्फ कोर्स येथे ९ (नऊ ) होलची सुविधा आहे. या स्पर्धेत पुरुष गटाच्या आणि महिलांच्या गटाच्या स्पर्धकांना या ९ होलचे दोन राऊंड्स खेळविले गेले. तर पुरुषांच्या नवोदित (Novice) गटातील खेळाडूंनाही ९ होलचा एक राऊंड खेळवण्यात आला.
नवोदित खेळाडूसाठी १८ होल्स खेळतांना बेस्ट परफॉर्मन्स बघून विजेता ठरवण्यात आला.
पुरुषांच्या अमॅच्युअर गटामध्ये ब्रिगेडीयर ए. के. गर्ग आणि एअर कामोडर प्रदीप नायर या दोन्हीही खेळाडूंनी सुंदर खेळ केला. या दोन खेळाडूंचे समसमान गुण मिळाल्यामुळे दोघांनाही.संयुक्त विजेतेपद मिळाले. तर या गटात कर्नल चंद्रमोहन शुल्क यांनी दुसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या नवोदित (novice) गटामध्ये चंद्रा कांत यांनी सुंदर खेळ करून या गटात विजेतेपद मिळविले तर राम रतन सिंग यांनी उपविजेतेपद मिळविले. महिलांच्या अमॅच्युअर गटामध्ये मिसेस. पुष्पलता गौतम यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर मिसेस सुंमन नैन यांनी दुसरा क्रमांक मिळविला.
मुलांच्या गटात १२ स्पर्धकांमध्ये विभोर भांडगे आणि आर्यन या दोन खेळाडूंनी चांगला खेळ करून संयुक्त प्रथम स्थान प्राप्त केले, तर वाहीन भट याने चांगला खेळ करून उपविजेतेपद मिळविले.
सर्व स्पर्धकांसाठी तीन वेगळे प्रकारात खेळल्या गेलेल्या तीन प्रकारातील आणखी एका स्पर्धेत लॉगेस्ट डिस्टन्स ड्राईव्ह या प्रकारात मनीष शहा यांनी सर्वात जास्त २८१ यार्डस लांब आतंरावर बॉल मारून प्रथम क्रमांक पटकावला. तर नियरेस्ट टू पिन या प्रकारात मिलिंद भागवत यांनी सर्वात कमी ६ फूट अंतरावर बॉल मारून पहिला क्रमांक मिळविला.
तर सेंटर लाईन या प्रकारात कर्नल सी. एम. शुल्क (व्हेट्रॉन) यांनी सेंटर लाईन जवळ ८” या सर्वात कमी अंतरावर बॉल मारून प्रथम स्थान मिळविले.
या स्पर्धेत गणेश बच्छाव यांनी अल्बाट्रॉस मारून म्हणजे केवळ दोन शॉटमध्ये बॉल पुश करून होलमध्ये बॉल पार केला. या सुंदर खेळामुळे त्यांना विशेष पारितोषीक देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत सर्व गटामध्ये विजेता, उपविजेता आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना भारतीय रेल्वेच्या इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगचे डायरेक्टर जनरल श्री राहुल गौतम यांच्या हस्ते आकर्षक चषक आणि रोख पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात आले.
खेळाडूंनी या गोल्फ कोर्से बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतांना या कोर्सेच्या ( ग्राउंड) रचने बद्दल आणि फेयर वे बद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी ए. बी. एच डेव्हलपर्स ग्रुप, मेक वर्ल्ड, बी. एल . व्ही. डी. रिसॉर्ट ग्रुप, जी. सी. एस. – एम. ए. आय. ग्रुप, डिकेथलॉन ग्रुप यांचे सहकार्य लाभले.
या स्पर्धाच्या आयोजनाकरीता विंग कमांडर प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे, श्री. पुजारी, आशिष केरोसिया आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण निकाल :- १) पुरुष अमॅचुअर गट :- १) ब्रिगेडियर ए. के. गर्ग आणि एयर कामोडर प्रदीप नायर (संयुक्त विजेते) २) कर्नल चंद्रमोहन शुक्ल.
२) पुरुष नवोदित (novice) गट १) चंद्रकांत ( विजेता २) रान रतन सिंग ( उपविजेता ३० अनिल घाणेकर ( तिसरा क्रमांक)
३) महिला अमॅचुअर गट :- १) मिसेस पुष्पलता गौतम (विजेता ) २) मिसेस सुमन नैन ९ उपविजेता)
४) मुले (kids) गट १) विभोर भांडगे आणि आर्यन (संयुक्त विजेते) २) वाहीन भट ९ उपविजेता)
५) लोंगेस्ट डिस्टन्स ड्राईव्ह :- १) मनीष शहा ( २८१ यार्ड )
६) सेंटर लाईन :- कर्नल सी. एम. शुक्ल आणि अपूर्व भांडगे ( संयुक्त पहिला क्रमांक )
नियरेस्ट टू पिन :- मिलिंद भागवत.
७) विशेष पारितोषिक (अल्बेट्रॉस ) गणेश बच्छाव.