नाशिक रोड मॅरेथॉन १२ फेब्रुवारीला रंगणार

Feb 7, 2023

नाशिक– नाशिक रोड परिसरातील तंत्रशुद्ध (प्रोफेशनल) मॅरेथॉन म्हणून समजल्या जाणाऱ्या “नाशिक रोड मॅरेथॉन-रन फॉर फन”च्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजता मनपा शाळा क्रमांक १२५ ग्राउंड, नाशिक रोड येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. २०२० मध्ये झालेल्या नाशिक रोड मॅरेथॉनमध्ये ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. परंतु कोरोनामुळे दोन वर्ष मॅरेथॉनचे आयोजन होऊ शकले नाही, अशी माहिती आयोजक विशाल मोटकरी यांनी दिली.

विशो फिटनेस मंत्रा या फिटनेस आणि मॅरेथॉन रनिंग ट्रेनिंग देणाऱ्या संस्थेने मॅरेथॉनच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांमध्ये व्यायामाबरोबरच आहाराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने “नाशिक रोड मॅरेथॉन- रन फॉर फन” चे आयोजन केले जाते. मॅरेथॉनची सुरुवात व पारितोषिक वितरण समारंभ मनपा शाळा क्रमांक १२५ ग्राऊंड नाशिक रोड येथे होणार आहे. देवळाली गाव, लॅम रोड परिसरातून मॅरेथॉन मार्गक्रमण करणार आहे.

नाशिक रोड रन फॉर फनमध्ये फॅमिली फन रनपासून ते व्यावसायिक स्पर्धेचा समावेश आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनमध्ये ३, ५, आणि १० किलोमीटरचा समावेश असणार आहे. प्रत्येक सहभागीस बक्षिसे, टी-शर्ट, स्पर्धा पूर्ण करणाऱ्यासाठी पदक, विजेत्यास रोख बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. तसेच मोठ्या पल्ल्याच्या शर्यतीसाठी तंत्रशुद्ध निकाल मिळविण्यासाठी चिप प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विशो फिटनेस मंत्रा – ७८२२८४९४९९ / ९८२२८७६४५२ असे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News