३३ व्या राज्य अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धा नाशिकमध्ये

Mar 3, 2023

नाशिक : नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विभागिय क्रीडा संकुल, पंचवटी, हिरावाडी, नाशिक येथे नाशिक पूर्वचे आमदार ऍड. राहुल ढिकले यांच्या प्रमुख सहकार्याने३३ व्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य तलवारबाजी अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांचे ७६५ खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांची निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक २४ ते २६ मार्च दरम्यान पुणे येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. या राज्य स्पर्धेचे उद्घाटन उद्या दिनांक ३ मार्च रोजी दुपारी ४.०० वाजता गोवा राज्याचे क्रीडा मंत्री गजेंद्र गौड आणि भारतीय तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष माजी मंत्री सतेज पाटीलयांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते, नाशिक रोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी अविनाश टिळ, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव डॉ.उदय डोंगरे, क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजन समिती प्रमुख राजू शिंदे, दीपक निकम यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News