राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा ; छत्रपती संभाजी नगरचे स्पर्धेत वर्चस्व तेजस पाटील

Mar 6, 2023

ऋषभ जाधव ,वैदेही लोहिया यांना वैयक्तिक प्रकारामध्ये सुवर्णपदक तर महिला सॅबर सांघिक मध्येही छत्रपती संभाजीनगर संघास सुवर्णपदक

नाशिक दिनांक ०५ मार्च : महाराष्ट्र राज्य तलवारबाजी   असोसिएशन आणि  नाशिक जिल्हा  तलवारबाजी  असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि नाशिक पूर्वचे आमदार  ऍड. राहुल ढिकले यांच्या सहकार्याने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुल, हिरवाडी, पंचवटी  येथे आयोजित  ३३  व्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य  तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी  छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत विविध पदके संपादन केली.तर  कोल्हापूर, ठाणे , सांगली  खेळाडूंनी त्यांना चांगली लढत देत रजत पदके मिळविली.
महिलांच्या सांघिक  सॅबर प्रकारामध्ये छत्रपतीं संभाजीनगर विरुद्ध ठाणे यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी प्रथमपासून आक्रमक खेळ करून दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी मिळविली तर ठाणे संघाने तिसरी लढत जिंकून आघाडी कमी केली.  परंतु चवथ्या लढतीत संभाजीनगरच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून हे लढत १०-०६ अशी जिंकून या प्रकारचे सुवर्णपदक आपल्या नांवे केले.  या प्रकारात नाशिक आणि मुंबईच्या संघाला सांघिक कांस्यपदक मिळाले.
 पुरुषांच्या वैयक्तिक फॉईल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या  तेजस पाटीलने अंतिम लढतीत  कोल्हापूरच्या अनिल महापतीवर १०-०७ अशी मात करून सुवर्णपदक पटकावले.
 तर  पुरुषांच्या  वैयक्तिक ईपी या प्रकारात छत्रपती संभाजीनगरच्या  ऋषभ जाधवने सुवर्णपदक मिळविले, तर सांगलीच्या गिरीश जकातेला रजत पदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात नाशिकच्या अजिंक्य दुधारे आणि भंडाराच्या  निखिल कोरडे यांना  कास्यपदक मिळाले.
महिलांच्या वैयक्तिक फॉईल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या वैदेही लोहियाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अंकिता सोळुंकेला १०-०७ असे पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. या प्रकारात  हर्षदा दमकोडवर (नागपूर) आणि  ज्योती सुतार (कोल्हापूर) यांना कास्यपदक मिळाले.
आज पार पडलेल्या स्पर्धेत विजयी  खेळाडूंना प्रमुख पाहुणे  माजी प्राचार्य आर .आर. पवार, पोलीस निरीक्षक सुजित काळे,  संतोष विसपुते, बालाजी चौरे यांच्या हस्ते आणि तलवारबाजी संघटनेचे मार्गदर्शक अशोक दुधारे, प्रकाश काठोळे, दत्ता गलाले, राजू शिंदे  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
  या स्पर्धेत पंच म्हणून कॉम्पिटिशन डायरेक्टर डॉ. भूषण जाधव (ठाणे) केदार ढवळे (मुंबई) डॉ. दिनेश वंजारे (छत्रपती संभाजीनगर). राहुल फडोळ (नासिक), बाबुराव जाधव (नंदुरबार) स्वप्निल तांगडे, सागर मगरे,आदी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पंच मंडळ आपली  जबाबदारी पार पाडत आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव राजू शिंदे, दीपक निकम, आनंद चाकोर अशोक कदम ,अमोल आहेर,  दीपक पाटील ,अविनाश वाघ, ज्योती निकम मनीषा काठे आधी प्रयत्नशील आहेत.
आजच्या स्पर्धेचे निकाल :- 
महिला – सांघिक सायबर 
१)छत्रपती संभाजीनगर -सुवर्णपदक
२)ठाणे – रजत पथक
३)मुंबई – कास्यपदक
४)नासिक- कास्यपदक
फॉईल मुले – वैयक्तिक
१) तेजस पाटील (छत्रपती संभाजीनगर) – प्रथम क्रमांक
 २)अनिल महापती (कोल्हापूर ) रजत पदक
३) शाकेर सय्यद – (छत्रपती संभाजीनगर) कास्यपदक
४) शिव यादव (पालघर) कास्यपदक
ईपी  मुले – वैयक्तिक
१) ऋषभ जाधव (छत्रपती संभाजीनगर) स्वर्णपदक
२) गिरीश जकाते ( सांगली), रजत पथक
३) अजिंक्य दुधारे (नाशिक) कास्यपदक
४)निखिल कोरडे (भंडारा) कास्यपदक
फॉईल  मुली – वैयक्तिक
१)वैदेही लोहिया (छत्रपती संभाजी नगर)  सुवर्ण  पदक
२) अंकिता सोळुंके (कोल्हापूर) रजत पदक
३) हर्षदा दमकोडवर (नागपूर) कास्यपदक
४) ज्योती सुतार (कोल्हापूर) कास्यपदक.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News