व्हि.डी.के. फाउंडेशनच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश

Mar 16, 2023

नाशिक  : कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये नाशिकच्या व्हि.डि.के. फाउंडेशनच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून पदके प्राप्त केली. १२ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये रिले या प्रकारात जानवी पाटोळे, आस्मिता वाघ आणि लहेर वालेचा. यांनी चांगली धाव घेत कास्यपदक पटकावले. त्याचबरोबर १० वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये रिले या प्रकारात आनंदी कळमकर हिने चांगली कामगीरी करून कांस्यपदक आपल्या नावे केले. या विजयी खेळाडूंना प्रशिक्षक वैजनाथ काळे आणि बाळासाहेब शिरफुले यांचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व विजेते खेळाडू सीएमसीएस कॉलेज, गंगापूर रोड येथील मैदानावर रोज कसून सराव करतात.
सर्व विजेत्या खेळाडूंचे सी.एम.सी.एस कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र कुमार, ॲथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे आणि सेक्रेटरी सुनील तावरगिरी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News