महाराष्ट्र राज्यस्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन

Apr 18, 2023

इव्हान फौंडेशन, ट्रॅक ब्लेझर्स आणि रनर्स क्लब अँड स्पोर्ट्स सेंटर महाराष्ट्र राज्यस्तरीय अँथलेटिक्स  स्पर्धेचे आयोजन                                                नाशिकमध्ये प्रथमच “ट्रॅक नाइट “ या नव्या उपक्रमाद्वारे खेळाडूंची प्रगती साधण्याचा मानस   

nashik : इव्हान फौंडेशन, ट्रॅक ब्लेझर्स आणि रनर्स क्लब अँड स्पोर्ट्स सेंटर यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा अँथलेटिक्स आणि महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन यांच्या परवंगीने आणि सहकार्याने नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच “ट्रॅक नाइट“ या उपक्रमाचे आयोजन दिनांक २८ ते ३० एप्रिल, २०२३ दरम्यान  करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील मुलांच्याकडे असलेले टॅलेंट विकसित करणे हा या उपक्रममागील मुख्य  उद्देश आहे.

नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलच्या सिंथेटिक्स ट्रॅकवर प्रथमच या नव्या उपक्रमाची सुरवात करण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिनांक २८ ते ३० एप्रिल, २०२३ दरम्यान महाराष्ट्र राज्य स्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ०८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे, १४ वर्षे, १६ वर्षे आणि १८ वर्षे वयोगटांच्या मुले आणि मुली या सहा वयोगटांचा समावेश आहे.

प्रथमच प्रकाश झोतात खेळण्याची संधी :- या स्पर्धा नाशिकमध्ये प्रथमच प्रकाश झोतात आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या वयोगटातील खेळाडूना प्रथमच प्रकाश झोतात खेळण्याची संधी मिळणार आहे. जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि त्यांना संपूर्ण जोमाने स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्याची संधी  मिळणार आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार असल्यामुळे खेळाडूना चांगल्या दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे.  या स्पर्धेत रनिंग, रिले, अडथळयाची शर्यत, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाली फेक, भाला फेक या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

या स्पर्धेमुळे खेळाडूंना खालील प्रकारच्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.

१)     प्रथमच प्रकाश झोतात खेळण्याची संधी.

२)      रनिंग आणि इतर सर्व क्रीडा प्रकाराचे एल. ई. डी. द्वारे इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर फोटो दिसणार असल्यामुळे खेळाडूंच्या रनिंगच्या वेळेची तंतोतंत (Accurate) नोंद होणार आहे.

३)  सर्व क्रीडा प्रकारांचे व्ही.डी.ओ. (Vedio) तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे नंतर प्रत्येक खेळाडूला आपल्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी चांगला उपयोग होणार आहे.

४)     फोटो फिनिश – रनिंगमध्ये रेस पूर्ण होतांना सर्वच खेळाडू जवळ-जवळ एकत्र रेस पूर्ण करतात. त्यामध्ये कोणता खेळाडू पुढे आहे याचे व्हीडियो द्वारे पुन्हा दाखवले जाणार आहे. जेणेकरून योग्य तोच निकाल मिळणार आहे.

५)     मोठ्या स्पर्धा प्रमाणे या स्पर्धेतही मोठे स्क्रीन लावण्यात येणार असून या स्क्रीनवर लगेचच खेळाडूंचे नांवे आणि त्यांची धावण्याची वेळ सर्वांना दिसणार आहे.

६)     विजेत्या खेळाडूंना मेडल्स, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके दिली जाणार आहे.

खेळाडूंना सहभागासाठी https ://merakidesign.in/tracknights-nashik-२०२३/.  या लिंकवर ऑन लाईन आपले प्रवेश निश्चित करता येतील.

तरी कृपया या स्पर्धेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहाभगी व्हावे असे आवहान करण्यात येत आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू, त्यांचे पालक, प्रशिक्षक, यांना आनंद वाटेल अश्या पद्धतीने स्पर्धेचे आयोजन असणार आहे अशी खात्री आयोजकांकडून देण्यात येत आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूना पालक, आणि क्रीडा प्रेमी यांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे असेही आवहान आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी चिराग पटेल, सिद्धार्थ वाघ यांच्याशी संपर्क करावा.

Email :- trackinfo.tms@gmail.com आणि मो. क्र. ९९२०६०७४५०/ ९६५७८७६१९५  /९३७०२८२३३७ /९३७२९९७७९८ या क्रमांकवर संपर्क करावा.

  

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News