विविध स्पर्धेमध्ये एच.ए.एल हायस्कुल व कॉलेजला मिळाले यश

Apr 26, 2023

नाशिक : ओझर (टाऊनशिप)शाळेतील 17 व 19 वर्षांतील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल तसेच कराटे, इत्यादी खेळ प्रकार, त्याचप्रमाणे मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात मैदानी स्पर्धेत राज्यस्तर शालेय स्पर्धेमध्ये रिले 4 बाय 400 मी. मध्ये पुणे, (बालेवाडी)येथे झालेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक संपादन केला. तसेच सोहेल शेख, अनुप तोडकर, मोहन हिला ,मनोहर खोदल या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली .

त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या 18 ते 22 एप्रिल 2023 दरम्यान अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेमध्ये हार्दिक खोडके इयत्ता नववी व आयुष विजय इयत्ता बारावी या दोन्ही खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावून विभागाचे व शाळेचे नाव लौकिक केले.
विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये अखिलेश देवरे, त्याचप्रमाणे कॅरम स्पर्धेमध्ये ज्योती जाधव, तेजस्विनी बिराडे, आकांक्षा जाधव, प्रेमदास ब-हे यांनी विभाग स्तरावर आपली चमक दाखवली तसेच गौरी करपे हिने नंदुरबार येथे विभाग स्तरावर बॉक्सिंग या खेळांमध्ये सहभाग नोंदवला.त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉक्टर सर डॉ मो.स. गोसावी सर ,एच. आर.डायरेक्टर डॉ.दीप्तीताई देशपांडे यांनी त्याचप्रमाणे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी शाळेचे ,अधीक्षक डॉ. खंडेलवाल सर,प्राचार्य श्री.एस बी शिरसाट व उपप्राचार्य एस.इ. पगारे, त्याचप्रमाणे शाळेचे उप मुख्याध्यापक श्री आर्.एल. पगारे, पर्यवेक्षक श्री.शेवाळे एस.एम. श्री निकम एस. सी. व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना क्रीडा शिक्षक श्री योगेश शिंदे ,संभाजी मुंतोडे व श्री सुनील एकार यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News