क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे गंगापूर धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

May 19, 2023

4500 ट्रक गाळ काढणार ; 9 कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता वाढणार
नाशिक –वाढते शहर तसेच पाण्याचा वाढलेला वापर यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्ष धरणात पाण्यासोबत वाहून आलेला गाळ काढून धरणाची साठवण क्षमता तर वाढेल सोबतच तो गाळ शेतकऱ्यांना देऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढेल या दृष्टिकोनातून क्रेडाई नाशिक मेट्रो महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या उपक्रमात सहभागी होत असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले. क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे सामाजिक जाणिवेतून गंगापूर धरणांमधील गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
 याप्रसंगी मंचावर सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहेमान, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद मेढे, क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर व मॅनेजिंग कमिटी सभासद नितीन पाटील हे होते.
 
 क्रेडाई ची संकल्पना 
नवीन रहिवासी इमारती चे बांधकाम करताना रहिवाशांसाठी अतिरिक्त पाण्याची गरज असते .त्याची पूर्तता करण्यासाठी नाशिक ला पाणी पुरवणाऱ्या गंगापूर धरणाची साठवण क्षमता वाढवणे आवश्यक आहे. साधारणतः ६ ब्रास ( १ ट्रक ) गाळ काढला तर सुमारे २०००० लिटर अतिरिक्त साठवण क्षमता वाढते. त्या मुळे भविष्यातील पाण्याची गरज पुरविण्यासाठी हा उपक्रम आवश्यक आणि उपयुक्त आहे – कृणाल पाटील ,अध्यक्ष 
 
 
 शासनाच्या उपक्रमात सहभागी झाल्याबाबत क्रेडाई नाशिक मेट्रोचे अभिनंदन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी जीतीन रहेमान म्हणाले की, देशात सर्वात जास्त धरण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य असून गाळामुळे धरणांची साठवण क्षमता कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. 
शेतकऱ्यांच्या जमिनीचे उत्पादन वाढावे म्हणून हा गाळ उपयुक्त असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांनी नमूद केले. 
या उपक्रमाची संकल्पना सांगतांना क्रेडाई मॅनेजिंग कमिटीचे सदस्य व समन्वयक नितीन पाटील म्हणाले की, प्रत्येक नवीन इमारत बांधली की तेथील रहिवाशांना पाणी लागते त्यामुळे त्या वाढीव पाण्याची सोय करण्यासाठी धरणाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे. हा उपक्रम 30 जून पर्यंत चालणार असून या कालावधीत सुमारे 4500 ट्रक गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर यांनी दिली.
 याप्रसंगी नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष रामेश्वर सारडा, नेमीचंद पोतदार, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव ऋषिकेश कोतेनरेंद्र कुलकर्णी,  सुशील बागड, श्याम साबळे, सागर शहा, निरंजन शहा, सभासद तसेच शेतकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News