४ थ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे वर्चस्व

Sep 15, 2019

नाशिक दिनांक १४ सप्टेंबर – नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दुधारे स्पोर्ट्स फौंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशन जवळील महेश भवन येथे   आयोजित  ४ थ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुलामध्ये ईपी प्रकारात  मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून या गटाचे अजिंक्यपद पटकावले. तर सॅबर प्रकारात यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या प्रकारात अंतिम फेरीत गुजराथचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. तर मुलींमध्येही मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून या प्रकारात विजेतेपद मिळविले. तर मुलीच्या फॉईल या प्रकारात गुजराथ विरुद्ध महाराष्ट्र यांच्यात झालेली अंतिम लढत चांगलीच चुरशीची झाली. या लढतीत पहिल्या दोन सामन्यात महाराष्ट्राच्या  मुलीनी चांगला खेळ करून २६- २३ अशी तीन गुणांची आघाडी घेतली. मात्र त्यानंतरच्या लढतीत  गुजराथच्या खेळाडूंनी संयमाने खेळ करून आपली पिछाडी भरून काढण्यात यश मिळविले, आणि ही लढत ४५- ४३  अश्या दोन गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. तर महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या फॉईल प्रकारात छत्तीसगडच्या खेळाडूंनी जोमाने खेळ करून अंतिम लढतीत मध्य प्रदेशचाअवघ्या तीन गुणांनी पराभव करून या प्रकारचे विजेतेपद मिळविले. तर मुलींच्या फॉईल प्रकारात गुजराथच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून विजेतेपद पटकावले तर या प्रकारात महाराष्ट्राला उपविजेतेपद मिळाले. 
उद्या मुलांच्या आणि मुलीच्या वैयक्तिक स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत अशी माहिती राजू शिंदे यांनी दिली. 
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  दत्ता पाटील , आनंद खरे, नितीन हिंगमिरे , राजू शिंदे , दिपक निकम , विक्रम दुधारे , मनिषा काठे , राहुल फडोळ,  पांडुरंग गुरव इ.प्रयत्नशील आहेत.
 
दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धचे निकाल :- 
मुलें 
ईपी – मुलें  -सांघिक  १) मध्यप्रदेश – प्रथम , २) छत्तीसगड – दुसरा क्रमांक , ३) महाराष्ट्र आणि राजस्थान   – तिसरा क्रमांक 
सॅबर –  मुलें  -सांघिक  १) महाराष्ट्र – प्रथम , २) गुजराथ – दुसरा क्रमांक , ३) छत्तीसगड आणि मध्य प्रदेश  – तिसरा क्रमांक 
फॉईल- मुलें – सांघिक १) छत्तीसगड – प्रथम , २) मध्यप्रदेश – दुसरा क्रमांक , ३)  छत्तीसगड आणि महाराष्ट्र   – तिसरा क्रमांक 
 
 
मुली 
 ईपी – मुली -सांघिक  १) मध्यप्रदेश – प्रथम , २) छत्तीसगड – दुसरा क्रमांक , ३) गुजराथ आणि महाराष्ट्र   – तिसरा क्रमांक 
फॉईल मुली -सांघिक  १) गुजराथ – प्रथम , २) महाराष्ट्र – दुसरा क्रमांक , ३)  छत्तीसगड आणि  मध्यप्रदेश   – तिसरा क्रमांक 
 
 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News