महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेत नाशिकच्या मित्र विहार संघाला ब्राँझ पदक. अध्यक्ष विनोद कपूर यांच्याकडून खेळडूंचे अभिनंदन

Sep 16, 2019

नाशिक  :- डोम्बिवली, मुंबई येथील ब्राम्हण सभा येथे दिनांक १३ ते १६ सप्टेंबर दरम्यान ” तोलानी चषक राज्यस्तरीय ब्रीज ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
 ब्रीज या खेळाचे खंदे समर्थक दिवंगत डॉ. एन. पी. तोलानी यांच्या स्मुती निमित्त तोलानी ग्रुपच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नाशिकच्या मित्र विहार क्लबच्या संघाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून ब्राँझ पदकाची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्हाच्या ६४ संघानी सहभाग घेतला होता. या ६४ संघादरम्यान पहिल्या दिवशी लीग पद्धतीने स्पर्धा खेळविली गेली यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पहिल्या सहा संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या लीगमध्ये नाशिकच्या मित्र विहार संघात समावेश असलेल्या हेमंत पांडे, डॉ. अतुल दशपुत्रे, सुनील पतकी, दिलीप गोसावी, माधव दिक्षीत, आणि आशिक राजे यांनी सुरवातीपासून आपआपसात चांगला समन्वय साधून पहिल्या सहामध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर या पहिल्या सहा संघादरम्यान सुपर लीग सामने खेळविले गेले. यामध्ये पहिल्या दोन सामन्यात नाशिकच्या  मित्र विहार संघाला फारसे गुण मिळविता आले नाही. परंतु तिसऱ्या सामन्यानंतर मित्र विहारच्या संघाने पुन्हा आपली लय मिळवत नंतरच्या तीनही सामन्यात चांगला खेळ करून एकूण ४७. ८७ गुणांची कमाई केली आणि या  अंतिम सुपर लीगमध्ये तिसरे स्थान मिळवत ब्राँझ पदकावर आपली मोहर उमटवली. या स्पर्धेत मुंबईच्या अनएक्सपेक्टेड संघाने ७०. गुणांसह सुवर्णपदक तर पुण्याच्या पांचे संघाने ५६. ३१ गुणांसह सिल्वर पदक मिळविले.     
 नाशिकच्या मित्र विहार संघाला माजी आय. ए. एस. अधिकारी तथा ब्रीज खेळाच्या उपक्रमासाठी कायम अग्रेसर असणारे  बापूसाहेब करंदीकर यांच्या हस्ते ब्राँझ पदकाचा चषक देऊन सन्मानित करण्यात आले. 
मित्र विहाराच्या या यशाबद्दल मित्र विहार क्लबचे अध्यक्ष तथा ब्रीजचे नामवंत खेळाडू आणि समर्थक विनोद कपूर ,  नाशिक ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन उकिडवे आणि सर्व क्रीडाप्रेमींनी या यशाबद्दल आणि या खेळाच्या माध्यमातून मित्र विहाराचे नांव राज्यात झळकावले याबद्दल  सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News