३६व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद खो-खो स्पर्धेसाठी नाशिकचे संघ जाहीर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शाहू खैरे यांच्याकडून खेळाडूंना शुभेछया. नाशिकचे संघ अंतिम फेरी गाठतील – गितांजली सावळे (प्रशिक्षक)

Sep 17, 2019

नाशिक दिनांक १७ सप्टेंबर :- धुळे येथे दिनांक १९ ते २२ सप्टेंबर, २०१९ दरम्यान  किशोर आणि किशोरी गटाच्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद खो-खो  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिकच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाची आज घोषणा करण्यात आली.  अलंगुनच्या आश्रम शाळेचा कल्पेश सहारे  मुलांच्या संघाचे कर्णधारपद भूषवणीर आहे,  तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी शासकीय कन्या शाळेची सोनाली पवार हिची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या नाशिकच्या संघात राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेते चिंतामण गावित आणि ललिता गोबले  यांचा समावेश आहे. याआधी ऑगस्टमध्ये नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशच्या वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे नाशिक  जिल्हा अजिंक्यपद  खो-खो स्पर्धा  आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १६-१६ मुलांची आणि मुलींची नाशिक जिल्हाच्या संघासाठी प्राथमिक निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या खेळाडूंचे दिनांक ४ सप्टेंबर पासून १० दिवसाचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरांमधून धुळे येथे होणाऱ्या ३६व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धासाठी नाशिकच्या अंतिम १२-१२ खेळाडूंची निवड करण्यात आली. 
प्रशिक्षकांना चांगल्या कामगिरीचा विश्वास – नाशिकच्या या दोन्हीही संघांचा चांगला सराव झाला असून हे दोन्हीही संघ धुळे येथे होणाऱ्या  राज्य स्पर्धेत  चांगली कामगिरी करतील असा विश्वास प्रशिक्षक गीतांजली सावळे आणि दत्तात्रय गुंजाळ यांनी व्यक्त केला. कारण  मागील वर्षी जळगांव येथे आयोजित राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या मुलींच्या  संघाने अंतिम फेरी गाठली होती,  तर मुलांनीही उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या  नाशिकच्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सतत सामाजिक आणि क्रीडा उपक्रम राबविणारे नाशिक महानगरपालिकेचे गटनेते शाहू खैरे, यांनी शुभेच्छा दिल्या.  या संघाच्या बाधणीसाठी आणि  शिबीरासाठी नाशिक जिल्हा सचिव मंदार देशमुख, उमेश आटवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
नाशिकचे संघ पुढीलप्रमाणे :- मुली :- सोनाली पवार (कर्णधार), ललिता गोबाले, ज्योती मेढे, दीदी ठाकरे, रंजना  पाटील,लतिका महाले, सरिता दिवा,ऋतुजा सहारे, शिवानी लहारे, दिपिका बोरसे, सुषमा चौधरी, तेजल सहारे. प्रशिक्षक – गितांजली सावळे, व्यवस्थापक – कांतीलक महाले, सह व्यवस्थापक – अश्वीनी बोरसे 
मुले –   कल्पेश सहारे (कर्णधार), चिंतामण चौधरी, रोशन गायकवाड, मछिंद्र वाघमारे, रोहिदास नेवळ, दिनेश कोहमकीरे, विष्णू बुधर, स्वराज जाधव, ओम कांगणे, आकाश बोरसे, जगन मोहंडकर, 
हरिदास घाटाळ.   प्रशिक्षक -दत्तात्रय गुंजाळ, , व्यवस्थापक – शंकर तरे.      
नाशिक खो-खो कर्णधार मूली – सोनाली पवार, मुले – कल्पेश सहारे
  

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News