नाशिक: एस.व्ही.के.एम., मुंबईचे जॉईंट प्रेसिडेंट तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त 24 ऑगस्ट 2024 रोजी एस.व्ही.के.एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर (प्रस्तावित) खर्दे बु. ता. शिरपूर येथे आयोजित भव्य रोग तपासणी, चिकित्सा व निदान शिबीरात शिरपूर तालुक्यातील 1226 नागरिक बंधू, भगिनींनी लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
शिबिराला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, सीईओ विशाल नरवाडे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांनी शिबिराला भेट देऊन अत्याधुनिक सोयीसुविधा पाहून खूपच आनंद व्यक्त केला.
यावेळी आ. काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, महाराष्ट्र माजी मुख्य सचिव जयंतकुमार बंठीया, सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, चिंतनभाई पटेल, श्रीमती केतकीबेन मुकेशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल, करण नथवानी मुंबई, द्वेता पटेल, सौ. दिशा पटेल, मुंबई ट्रस्टी भार्गवभाई पटेल, हर्षदभाई शाह, डॉ. जे.पी.गांधी, हरित चितालिया, प्रविण दोशी, जगदिश पारीख, राजगोपाल भंडारी, राहुल दंदे, ए.एस.आगरकर, गोपाल भंडारी, शैलेंद्र अग्रवाल, विजय अग्रवाल, वर्षा परब मुंबई, गुलाबराव गुजर, राजेंद्र देवरे, ईश्वर पाटील, मुंबई डॉक्टर्स टीम, शिरपूर हॉस्पिटल टीम, शिरपूर येथील आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व एच.आर.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च चे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, शिरपूर शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई येथील सुप्रसिद्ध, नामांकित, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ डॉक्टर्स यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करुन पुढील योग्य तो सल्ला दिला. यावेळी नेत्र तपासणी, हाडांचे आजार, जनरल फिजिशिअन, छातीचे आजार, डायबेटीस, थायरॉईड, मूत्रपिंड आजार, हृदय उपचार तसेच नाक, कान, घसा आणि बालरोग, स्त्री रोग, एंडोक्रीनोलॉजी या विविध रोग तपासणी साठी शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी शिबीर ठिकाण एस.व्ही. के. एम. संचालित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर (प्रस्तावित), खर्दे बु. ता. शिरपूर जिल्हा धुळे येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
मुंबई येथील सुप्रसिद्ध डॉक्टर्स टीम,
डॉ. अब्दुल अन्सारी (क्रिटीकल केअर डायरेक्टर), डॉ. प्रशांत छाजेड (सिनिअर कन्सलटंट, पाल्मोनॉलॉजी, डॉ. अनुप चौधरी (सिनिअर कन्सलटंट, नेफ्रोलॉजी), डॉ.सुरेश शेट्टी (सिनिअर कन्सलटंट, ऑर्थोपेडिक्स), डॉ.गिरीष परमार (सिनिअर कन्सलटंट, एंडोक्रोनोलॉजी), डॉ.निमिश कुलकर्णी (कन्सलटंट पेडियाट्रिक्स), डॉ. पंकज पाटकर (एच.ओ.डी. रेडिओलॉजी, डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस), डॉ. रित्विक ठकराल (कन्सलटंट रेडिओलॉजी), डॉ. शेफाली पारीख (कन्सलटंट ऑफथलमोलॉजी), डॉ.जयंत गांधी (सिनिअर कन्सलटंट, नाक, कान, घसा), डॉ. कुणाल शाह (कन्सलटंट, इंटरनल मेडिसीन), डॉ. देवंशी मोदी (कन्सलटंट, गायनेकोलॉजी), डॉ.सुरेंद्र वडगांवकर (सिनिअर कन्सलटंट, ऑफथलमोलॉजी) आदी डॉक्टर्स यांनी सेवाभावी कार्याला मनापासून सहकार्य करुन गोरगरीब, गरजू व असंख्य रुग्णांना सेवा दिली.





