” एन.डी. बी. ए. – केन्सिंगटन बॅडमिंटन लीग ” स्पर्धेत चुरशीच्या लढतीत आदीश शटलर्सने पटकावले विजेतेपद, तर सुपर जायंट्स उपविजयी खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस – प्रकाश मते माजी महापौर.

Sep 23, 2019

नाशिक :-  नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि  केन्सीगंटन  क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने  केनसिंगटन क्लब, गंगापूर रोड  येथे आयोजित करण्यात आलेल्या 
 ” एन डी. बी ए. – केन्सिंगटन  बॅडमिंटन लीग” स्पर्धेत अगदी संघर्ष पूर्ण झालेल्या अंतिम लढतीत ३-३ अश्या बरोबरीनंतर आदीश शटलर्स संघाने निर्णायक सातव्या सामन्यात विजय संपादन करून या  २ ऱ्या  ” एन डी. बी ए. – केन्सिंगटन  बॅडमिंटन लीग”  स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.  तर केवळ एका पराभवामुळे सुपर जायंट्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  या स्पर्धेत २० गुण मिळवणाऱ्या निवेक संघाला तिसरा तर १९ गुण मिळविणाऱ्या हॉट शॉट्स संघाला चवथा क्रमांक मिळाला. 
या स्पर्धेच्या पारितोषीक समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे माजी महापौर  तथा क्रीडा क्षेत्रासाठी मोलाचे योगदान असलेले प्रकाश मते, केन्सिंगटन क्लबचे संचालक तथा या स्पर्धाचे सह – आयोजक विक्रांत मते, नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, डॉ. शर्मिला कुलकर्णी. प्रकाश शिकची, योगेश एकबोटे, संजय सोनावणे, अनंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यां मान्यवराच्या हस्ते विजयी संघाना आकर्षक चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांचाही स्मुतीचीन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 
यावेळी बोलतांना प्रकाश मते यांनी सांगितले की क्रीडा संघटना खेळाडू घडवण्याचे मोलाचे काम करत आहेत. या खेळाडूंना आणि संघटकांना सहकार्य करून आणखी  चांगले खेळाडू घडावे यासाठी आमचा प्रयत्न आहे असे सांगून विजयी खेळाडू तसेच जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राधेश्याम मुंदडा यांनी या स्पर्धा आयोजनासाठी केन्सिंगटन क्लब, या स्पर्धासाठी सहकार्य केलेले प्रायोजक, आपले सर्व सहकारी, पंच यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश एकबोटे यांनी केले. 
सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला पाच साखळी सामने असे एकूण १५ साखळी सामने खेळविले गेले.  
याशिवाय या स्पर्धेत ट्रम्पचा अवलंब केला गेला, आणि ही ट्रम्पची लढत जिंकल्यास आणखी एक बोनस गुण त्या जोडीला आणि संघाला दिला गेला. अश्या गुणांच्या पद्दतीने सर्व साखळी सामन्यात  आदीश शटलर्स आणि सुपर जायंट्स या दोन्हीही संघानी सर्वात जास्त प्रत्येकी २५ गुण मिळविले. या गुणांच्या आधारे या दोन संघादरम्यान अंतिम लढत खेळविली गेली. तब्बल साडे तीन तास चाललेल्या या अंतिम लढतीत खेळल्या गेलेल्या सात दुहेरी सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यात फारच संघर्ष दिसून आला. पहिल्या सामन्यात सुपर जायंट्सच्या महेश बलानी – भगवान इप्पर यांनी आदिश संघांच्या गणेश लांडे – अमित कुलकर्णी यांचा २१-१४, १६-२१, २१-१६ असा २-१ ने पराभव करून आपल्या संघाला विजयी सुरवात करून दिली. मात्र दुसऱ्या सामन्यात आदीश शटलर्सच्या आशिष तोरणे- अर्जुन गुंडे यांनी अविनाश आपटे- प्रशांत पाटील यांचा २-० असा पराभव करून १-१ अशी बरोंबरी साधली. तर तिसऱ्या सामन्यात आदीश शटलर्सच्या विक्रम उगले – प्रशांत दुधेडीया यांनीही सुंदर खेळ करून सुपर जायंट्सच्या प्रितम जपे- रवी आढाव यांना २१-१९, २१-११ असे पराभूत करून २-१ अशी आघाडी प्रस्थापित केली. 
मुलांच्या  आणि मुलींच्या सामन्यात चुरस :- त्यानंतर झालेले १७ वर्ष मुलांचा आणि मुलीच्या सामन्यात फारच चुरस दिसून आली . यामध्ये मुलांच्या सामन्यात  सुपर जायंट्सच्या       हर्ष महाजन – जगतार गहिरं यांनी पहिला सेट २१- १४ असा जिंकून आघाडी घेतली. परंतु दुसऱ्या सेटमध्ये  आदीश शटलर्सच्या विपुल चाफेकर – आदित्य गुप्ता यांनी जोमाने खेळ करून दुसरा सेट २१-१९ असा जिंकून  १-१ अशी बरोबरी साधली. परंतु तिसऱ्या सेटमध्ये  हर्ष महाजन – जगतार गहिरं  यांनी प्रथमपासून आघाडी घेऊन हा निर्णयक सेट २१- १७ असा जिंकून  २-२ अशी बरोबरी साधली.तर पुरुषांच्या पाचच्या सामन्यात आदीश शटलर्सच्या आदित्य कासार – मनोज महाजन यांनी प्रणव सवई – मिहिर मैशिरी यांचा २-० असा पराभव करून ३-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतरच्या मुलींच्या सामन्यातही असाच संघर्ष दिसून आला. पहिल्या सेटमध्ये  आदीश शटलर्सच्या आकांशा साळुंके – रिद्धी कांदोई यांनी पहिला सेट २१- १४ असा जिंकला. त्यानंतर मात्र  श्रावणी वाळेकर – जिया सेठी यांनी जीडीने कधी नेजवळ सुंदर ड्रॉप्स टाकून तर कधी बेस लाईनवरून जोरदार स्मेशेस मारून दुसरा सेट २१- १० आणि तिसरा सेट २१० – ११ असा जिंकून या सामन्यात ३-३ अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. त्यानंतर शेवटच्या निर्णायक सामान्यांपर्यंत गेलेल्या या अंतिम लढतीत  आदीश शटलर्सकडून खेळताना अजिंक्य पाथरकर – अमित देशपांडे या जोडीने आपल्या अनुभवाच्या आधारे  सुपर जायंट्सच्या चंदन जाधव- ऋषीकेश होले यांचा २१- १४, २१- १६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. या स्पर्धेत २० गुण मिळवणाऱ्या निवेक संघाला तिसरा तर १९ गुण मिळविणाऱ्या हॉट शॉट्स संघाला चवथा क्रमांक मिळाला.   
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राधेश्याम मुंदडा, डॉ. शर्मिला कुलकर्णी प्रकाश शिकची, नितीन चौधरी, योगेश एकबोटे, अनंत जोशी, पराग एखण्डे, मिलिंद जोशी, आदीनी चांगले परिश्रम घेतले. .   
या स्पर्धाची तांत्रिक बाजू आंतरराष्ट्रीय पंच संजय सोनावणे यांच्या अधिपत्याखालीत्याची सर्व सहकारी पंच यांनी   सांभाळली. 
स्पर्धेचा अंतिम निकाल   :- 
१) आदीश शटलर्स  – विजेता संघ 
२)  सुपर जायन्ट्स     – उप विजेता संघ 
३) निवेक संघ            – तिसरा क्रमांक    
२)  हॉट शॉट              – चवथा क्रमांक 

अजून बातम्या वाचा..

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News