नाशिक शहरामध्ये टीम ईथ्री गेल्या दीड वर्षापासून सायकलिंगचे विविध उपक्रम राबवीत असते, त्यात दर महिन्याच्या पहिल्या रविवारी १०० किमी ची सेन्चुरी राईड (आता पर्यंत १७ राईड) आणि शेवटच्या रविवारी वॉव (WOW) राईड म्हणजे फक्त महिलांसाठी निशुल्क सायकलिंग (आता पर्यंत ०७ राईड) तसेच आंतरराष्ट्रीय नियमानुसार नाशिक ड्युअथलॉन स्पर्धा घेण्याचा मान टीम ईथ्री ला जातो, आणि आता महाराष्ट्रातील सर्वात कठीण अशी जामुंडा हिल्स हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले, त्यात मुंबई पुणे औरंगाबाद ठाणे जालना राहुरी नाशिक आणि केनिया येथून मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते.
नाशिक हे एकेकाळी हिल स्टेशन म्हणून ओळखले जायचे, तीच ओळख परत करून देण्याचा एक प्रयत्न म्हणून जामुंडा हिल्स ह्या निसर्गरम्य परिसरात ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली, ही मॅरेथॉन स्पर्धा चार प्रकारच्या अंतरात म्हणजे ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी मध्ये ४ वेगवेगळ्या श्रेणीत घेण्यात आली अशी माहिती कपिल गिरी ह्यांनी दिली.
एकूण रुपये १,०८,००० (एक लाख आठ हजाराची) बक्षिसे तेजस्वी ज्वेलर्स तर्फे देण्यात आली आणि सदर स्पर्धांना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक ह्यांची मान्यता प्राप्त होती, अशी माहिती टीम ईथ्री चे सचिव धिरज छाजेड ह्यांनी दिली.
२१ किमी हाफ मॅरेथॉनची बक्षिसे: प्रथम बक्षीस – ₹ ११००० रोख, व्दितीय बक्षीस – ₹ ५००० रोख, तिसरं बक्षीस – ₹ २००० रोख
१० किमी चँलेंज रंनिंगची बक्षिसे: प्रथम बक्षीस – ₹ ५००० रोख, व्दितीय बक्षीस – ₹ ३००० रोख, तिसरं बक्षीस – ₹ १००० रोख
5 किमी पुरुष:
वयोगट 15 ते 30
1. नवीन शर्मा
2. रोहित तुपे
3. शुभम तुपे
वयोगट ३० ते ४५
1. संतोष भोळे
2. उत्तम देवगिरे
3. भाऊसाहेब धोंगडे
वयोगट ४५ वरील
१. दशरथ चुंबळे
२. रतन पाटील
३. महेश बिरारी
5 किमी वयोगट 15 ते 30 महिला
1. पूर्वी रायते
2. सावी देशमुख
3. प्रतीक्षा धोंगडे
वयोगट ३० ते ४५
१. सुनिता पंडिता
२. सुहानी सिंग
३. राजश्री बोरसे
वयोगट ४५ वरील
१. रेवती चितको
१० किमी वयोगट १८ ते ४० पुरुष
१. कांतीलाल कुंभार
२. सिध्देश बर्जे
३. निवृत्ती बागुल
१० किमी वयोगट ४० पुढील पुरुष
१. राम लीमभारे
२. राज घोराई
३. भगवंता राउत
१० किमी वयोगट १८ ते ४0 महिला
१. आरती देशमुख
२. अश्विनी काटोले
३. पूजा भट्टड
१० किमी वयोगट ४० पुढील महिला
१. सुमुखी अथणी
२. नंदा गायकवाड
३. नीरजा मलिक
२१ किमी वयोगट १८ ते ४० पुरुष
१. इसाक केम्बोई
२. दिनकर महाले
३. अविनाश पवार
२१ किमी वयोगट ४० पुढील पुरुष
१. शिवानंद शेट्टी
२. संतोष वाघ
३. माणिक निकम
२१ किमी वयोगट १८ ते ४० महिला
१. निवृत्ता धवड
२. श्रुती पांडे
३. पूनम वाणी
२१ किमी वयोगट ४० पुढील महिला
१. शीतल संघवी
२. विद्या बेंडले
३. स्मिता गाडेकर
स्पर्धेची वेळ व तारीख – सकाळी ६ वाजता, दिनांक २२ सप्टेंबर २०१९
स्पर्धेचे ठिकाण – जामुंडा हिल्स, भावली डॅम जवळ, इगतपुरी. (नाशिक पासून ६० किमी)
स्पर्धेचा मार्ग – जामुंडा हिल्स – कुरुंगवाडी – आंबेवाडी – परत त्याचमार्गे जामुंडा हिल्स येथे समाप्ती.
गिरीझ डेवलपमेंट कम्पनी प्रस्तुत जामुंडा हिल्स हाफ मॅरेथॉन मध्ये कमिशनर साहेब श्री. विश्वास नांगरे पाटील, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. राजेंद्र नेहेते, तुषार पटवर्धन, अनिरुद्ध अथणी अश्या अनेक मान्यवरांनी नाव नोंदणी केली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील ह्यांनी दिली.
जामुंडा हिल्स हाफ मॅरेथॉन सपोर्टेड बाय:
गिरीझ डेवलपमेंट कम्पनी,तेजस्वी ज्वेलर्स ,क्रीडक स्पोर्ट्स,रेडिओ विश्वास ९०.८ एफ. एम.गिरी मीडिया सर्व्हिसेस,डॉ पिंप्रीकर स्पोर्ट्स मेड रिहँबफास्ट अँड अप,हॉटेल एमेराल्ड पार्क
हि मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी सिध्दार्थ गिरी, कपिल गिरी तसेच टीम ई-थ्री चे गणेश पाटील, धिरज छाजेड, विकाश जैन, राज लुथ्रा, शिशिर आचार्य, रोहन पटेल, हर्षद टकले, अतुल लाखलानी आणि शैलेंद्र पाटसकर ह्यांनी मेहनत घेतली.






