कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आकांक्षा शिंदे सुवर्ण पदक

Sep 29, 2019

 

इंग्लंड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नाशिकची आकांक्षा शिंदे हिने प्री कॅडेट वयो गटात ४८ किलो खालील वजन गटामध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले .या तिच्या यशामुळे आकांक्षा ही नाशिकमधली पहिली आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू ठरली. सदर स्पर्धा २८ सप्टेंबर २०१९ ला पार पडली .
सदर स्पर्धेत २० देशांनी सहभाग घेतला. भारत, इंग्लंड, स्कॉटलंड, बॉस्निया, वेल्स, आयर्लंड, जमैका, ई. या सारख्या आदी देशांनी सहभाग घेतला. आकांक्षा च्या एकूण ४ सामने झाले.
आकांक्षा चा पहिला सामना इंग्लंड सोबत झाला या सामन्यात आकांक्षाने एका गुणाने विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यामध्ये स्कॉटलंड सोबत ओगोशी या डावपेच वर इप्पोन हा सर्वोच्च गुण घेऊन एकहाती सामना जिंकला. तर तिसऱ्या सामन्यामध्ये स्कॉटलंड च्याच खेळाडूला २ वाझारी गुण मिळवत विजय मिळवित अंतिम सामन्यासाठी प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूवर एक वाझारी गुण मिळवत सुवर्ण पदक जिंकले व नाशिकमधील पहिली आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू ठरली.
आकांक्षा हिने आजवर विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदके पटकावली आहेत. आकांक्षा सध्या श्री योगेश शिंदे, सुहास मैंद, स्वप्निल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा ज्युदो प्रशिक्षण केंद्रात सराव करते.
तसेच आकांक्षा सध्या पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १०वी मध्ये शिकते. या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रमेशचंद्र पांडा यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
आकांक्षा ला सदर स्पर्धेतील विजयासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे चे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नाशिक विभागीय क्रीडा आयुक्त चंद्रकांत कांबळे , जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे सचिव रत्नाकर पटवर्धन, व असोसिएशनचे पदाधिकारी यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News