नाशिक : – विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात 8 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सिन्नर मतदारसंघातून सिंमतिनी कोकोटे यांनी भारतीय जनता पक्षातून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. निफाड मतदारसंघातून अनिल कदम यांनी दोन अर्ज व वैशाली कदम यांनी शिवसेना पक्षातून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
नांदगांव मतदारसंघातून विष्णू शंकर चव्हाण , सिन्नर मधून माणिकराव कोकाटे, नाशिक पूर्व मधून नितीन गुणवंत यांनी तर नाशिक पश्चिम मधून देवा वाघमारे व बिपिन कटारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती निवडणूक शाखेने कळविली आहे.




