नाशिक जिल्हा फ्लोअर बॉल स्पर्धेत रायन इंटरनॅशनल स्कूलला दुहेरी मुकुट

Oct 3, 2019

नाशिक : – नाशिक जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशनच्या वतीने वरिष्ठ गट फ्लोअरबॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत मुलामध्ये आणि मुलीमध्ये स्पर्धेत रायन इंटरनॅशनल स्कूलच्या संघानी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या दोन्हीही गटाचे विजेतेपद पटकावले. दोन्हीही गटात भाऊसाहेबानगरच्या माधवराव बोरस्ते संघाला उपविजेतेपदावर समाधान मानवंबवे लागले. मुलामध्ये के. टी. एच.एम. संघाने तर मुलींमध्ये के.के.वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगरच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत मुलांच्या १४ संघानी तर मुलींमध्ये ९ संघानी सहभाग घेतला.
मुलामध्ये रायन इंटरनॅशनल स्कुल आणि माधवराव बोरस्ते विद्यालय निफाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत रायन इंटरनॅशनलच्या खेळाडूंनी प्रथमपासूनच आक्रमक खेळ करून मध्यंतराला ३-१ अशी आघाडी घेतली. तर उत्तरार्धातही हीच लय कायम राखत त्यांनी हा सामना ७- ३ असा जिंकून मुलांचे विजेतेपद पटकावले. मुलींमध्ये झालेल्या अंतिम सामन्यातही रायन इंटरनॅशनलच्या खेळाडूंनी मुलांप्रमाणेच जोमाने खेळ करून माधवराव बोरस्ते विद्यालय निफाड संघाचा ५ विरुद्ध २ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतून नाशिक जिल्हाचे मुलांच्या आणि मुलींच्या संघाची निवड करण्यात आली. हे निवड झालेला संघ दि. ४ ते ६ ऑक्टोबर २०१९ दरम्यान गोंदिया येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्याचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेचे विजेत्या संघाना शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, आनंद खरे, क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव अविनाश वाघ यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत स्वप्नील वाळके यांनी तर सूत्रसंचालन मयूर गुरव यानी केले.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी अविनाश वाघ , अमोल आहेर, वैभव दशपुते, मनिषा काठे आदिंनी प्रयत्न केले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
मुले प्रथम :- रायन इंटर नशनल स्कूल ,
द्वितीय :- माधवराव बोरस्ते स्कूल भा. नगर ,
तृतीय :- के.टी.एच एम. नाशिक.
मुली :- प्रथम :- रायन इंटर नशनल स्कूल ,
दुसरे :- माधवराव बोरस्ते स्कूल भा. नगर ,
तृतीय :- के.के.वाघ विद्याभवन भा. नगर

राज्य स्पर्धा साठी निवड झालेले नाशिकचे संघ
मुले – सूरज वाणी (कर्णधार),आफताब मुल्तानी (उप कर्णधार), इसाक धारवत, सैमुएल मैथु, अनुराग पाटील, उमेश मलिपड्डी, भाविन जैन, लोहित गायकवाड़, प्रफुल दळवी, आयुश बर्वे, खुशाल धोंगडे, क्लपेश पाटील, कृष्णा जाधव, आदित्य हीरे, आदित्य होळकर.
मुली- जान्हवी देशमुख (कर्णधार), अर्पिता विपिन (उपकर्णधार), नीकीत जोंधळ, श्रेया अहिरराव , लास्या जोहारे,आरती महाले, निकीता मोकाटे, सृष्टी खिंची, किंजल अहिर, श्रावणी पगार, निशा हीरे, सीद्धीका पोतिनिस, साक्षी होळकर, पूजा नीखाडे,प्रामणी तीडके.

अजून बातम्या वाचा..

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

सायबर गुन्हे व सामाजिक सुरक्षेबाबत जागरूकता ही काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे

Nashik : एस.एम. अॅक्टिव्ह फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित सामाजिक जनजागृती कार्यक्रमात महिलांच्या...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वैष्णवी खलाणे व रोहित चव्हाण यांची राज्यस्तर स्पर्धेत घवघवीत यश

Nashik : नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुदो संघटनेच्या राज्यस्तर स्पर्धा दि. 1ते 5 फेब्रुवारी 2024...

read more
एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

एच ए एल कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक योगेश शिंदे यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान

नाशिक :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या एच ए एल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे...

read more
Breaking News