दिपक पोद्दार, जितेंद्र सोलाणी, सुभाष धाक्रस, आर. श्रीधरन, सुब्रता शहा, आणि सूकमल दास यांची उत्कृष्ट कामगिरी.
दिनांक ४ ऑक्टोबर :- दिनांक १५ ते २९ सप्टेंबर दरम्यान ऊहान ,चीन येथे ४४ व्या जागतिक ब्रिज स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होते. या स्पर्धेत “डी ऑर्सी ” या सीनियर गटात खेळतांना दिपक पोद्दार, जितेंद्र सोलाणी, सुभाष धाक्रस, आर. श्रीधरन, सुब्रता शहा, आणि सूकमल दास यांचा समावेश असलेल्या भारताच्या संघाने अगदी सुंदर खेळ करून बलाढय नेदरलँड संघाचा पराभव करून या जागतिक ब्रीज स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई केली. त्यांना या स्पर्धेमध्ये कर्णधार विनय देसाई आणि प्रशिक्षक अनल शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या स्पर्धेत जगभरातील युएसए, नेदरलँड, रीयुनियन , डेन्मार्क, युएई, जपान, हॉंगकॉंग, नॉर्वेचे, इंग्लंड, इंडोनेशिया, फ्रान्स, स्वीडन, इटली, आयर्लंड, बल्गेरिया, पोलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चायना तैपेई, तुर्की, न्यूझीलंड, बल्गेरिया, इस्रायल, लाटव्हिया, नॉर्वे, रूमानिया, रशिया, स्कॉटलंड, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, बांगला देश, पाकिस्थान, बार्बाडोस, गुड़ेलौपे, त्रिनिनाद आणि टोबॅको, सिंगापूर, थायलंड, इजिप्त, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, ट्युनेशिया, चीन आणि भारत अश्या ४४ संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ” बर्मुडा बाऊल ” चा खुला गट, “डी ऑर्सी ” चा सिनियर गट, ” व्हेनिस कप” महिला गट आणि ” मिक्स टीम ” चा मिश्र गट अश्या चार गटाचा समावेश होता.
२४ संघाचा सहभाग असलेल्या “डी ऑर्सी ” च्या सिनियर गटात दिनांक १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान २२ राऊंड्स खेळविले गेले. या २२ राऊंडनंतर मिळालेल्या गुणानुक्रमे पहिल्या आठ संघाना बाद फेरीत प्रवेश मिळाला. यामध्ये भारताच्या संघाने अगदी सुंदर खेळ करून दुसऱ्या क्रमांकाने ही बाद फेरी गाठली. या बाद फेरीत खेळविण्यात आलेल्या उपउपांत्य फेरीच्या सहा राऊंडमध्येही भारताच्या संघाने आपापसात चांगला समन्वय साधून १७० गुणांची कमाई करून पहिल्या चार संघामध्ये स्थान पक्के करून उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर झालेल्या उपांत्य फेरीतही भारताच्या खेळाडूंनी आपल्या सहा राऊंडमध्ये चांगला खेळ केला. मात्र या सहा राऊंडमध्ये भारताला १२४ गुण मिळविता आले. त्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकासाठी म्हणजेच ब्राँझ पदकासाठी नेदरलँडविरुद्ध खेळावे लागले. या लढतीत भारताच्या खेळाडूंनी चांगला समन्वय साधून या पाच राऊंडमधील प्रत्येक सामन्यात नेदरलँडच्या तुलनेत जास्त गुण मिळविले आणि एकूण १७० गुण मिळवत ब्राँझ पदकावर आपले नाव पक्के केले. या गटात डेन्मार्कच्या संघाने सर्वात जास्त १९४ गुण मिळवत गोल्ड कप आपल्या नावे केला, तर इंग्लंड संघाने १६७ गुण मिळवून सिल्वर कप मिळविला. या स्पर्धात अंतर्भाव असलेल्या खुला गट, महिला गट आणि मिश्र गट यामध्ये भारताच्या संघांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळविता आले नाही या स्पर्धेत ब्राँझ पदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या खेळाडूंना भारतीय ब्रीज फेडेरेशनचे सरचिटणीस आनंद सामंत, विनय देसाई आणि प्रशिक्षक अनल शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. केवळ त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही या जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदकाची मजल मारू शकलो अश्या भावना भारतचे खेळाडू दिपक पोद्दार, जितेंद्र सोलाणी, सुभाष धाक्रस, आर. श्रीधरन, सुब्रता शहा, आणि सूकमल दास यांनी व्यक्त केल्या.






