डॉ. सुधीर शेतकर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून रुजू …

Mar 16, 2022

नाशिक  : डॉ. सुधीर शेतकर यांनी नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ( AIIMS ) या सर्वोच इन्स्टिट्यूट मधून कार्डिओलॉजी या विषयात पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे, डॉ सुधीर शेतकर हृदयरोग विभाग प्रमुख व वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून पूर्ण वेळ कार्यरत असणार आहे.

डॉ सुधीर शेतकर नाशिक जिल्यातील सुप्रसिद्ध इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांना १२ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी आपल्या अनुभवातून अनेक अवघड हृदय विकार रुग्णांनावर यशस्वी उपचार केले आहेत आणि यासोबतच जनसामान्य मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ सुधीर शेतकर यांनी आतापर्यन्त आतंरराष्ट्रीय स्तरावर हृदयसंबधीत वेगवेगळ्या विषयांवर संशोधनात्मक प्रबंध सादर केले आहेत. तसेच आजतागायत त्यांनी १२००० पेक्षा जास्त रुग्णांची रेडियल अँजिओग्राफी / अँजिओप्लास्टी / गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी केली आहे. २०० पेक्षा अधिक रुग्णांना एफएफआर/आयव्हीयुएस / ओसीटी या अत्यधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी योग्य निदान करून रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. याच प्रमाणे बऱ्याच रुग्णांना कार्डियाक रिदम डिसऑर्डर ( पेसमेकर / एआयसीडी ) या स्वरूपाचे यंत्र बसून हृदयरोग्यांना नवं संजीवनी दिली आहे. हार्ट फेल्युअर मॅनेजमेंट आणि कार्डियाक ट्रान्सप्लांट, नॉन इनवेसिव्ह कार्डिओलॉजी क्लिनिकल कार्डिओलॉजी या सर्वां मध्ये ते अत्यंत निपुण आहेत.रुग्णाला सर्वोत्तम रुग्ण सेवा देण्यासाठी ते उत्तर महाराष्ट्रासह भारतात सुद्धा ओळखले जातात

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News