अपोलो हॉस्पिटल नाशिकने ७५ किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा केला पूर्ण

Jun 4, 2022

नाशिक : अपोलो हॉस्पिटल नाशिक ने ७५ किडनी प्रत्यारोपणाचा टप्पा ५ वर्षात पूर्ण केला आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अपोलो हॉस्पिटल नाशिक चे किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल यांनी सांगितले. अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये आमच्या टीमने सप्टेंबर २०१६ मध्ये पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली होती आणि त्यानंतर अवघ्या ५ वर्षात ७५ रुग्णांवर किडनी प्रत्यारोपण झाले आहे. या मध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले पेडियाट्रिक किडनी ट्रान्सप्लांट,कॅडेवर ट्रान्सप्लांट,लिविंग (रिलेटेड आणि अनरिलेटेंड) ट्रान्सप्लांट एबीओ (वेगळया रक्तगटाचे ) ट्रान्सप्लांट असे गुंतागुंतीचे ७५ किडनी प्रत्यारोपण आतापर्यंत करण्यात आलेले आहेत. उत्तर महाराष्ट्रात लॅप्रोस्कोपिक पध्दतीने डोनर सर्जरी करण्याची सुरवात अपोलो येथे झाली आहे. ७५ किडनी प्रत्यारोपणातील बरेच रुग्ण हे ग्रामीण भागातही असून अनेकांची आर्थिक परिस्थिती दुर्बल होती. अशा रुग्णांकरिता अपोलो हॉस्पिटल तर्फे काही स्वयंसेवी संस्थ तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक देणगी मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना नाशिक मध्येच अदयावत सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना दुस-या शहरात जाउन उपचार घेण्याची गरज पडत नाही. त्यांची गैरसोय होत नाही. अपोलो हॉस्पिटल नाशिक नेहमीच सर्वसामान्यांना परवडणा-या दरात आणि दर्जेदार उपचार करण्यात नेहमीच अग्रेसर आहे.

अपोलो हॉस्पिटलचे युरो सर्जन डॉ.प्रवीण गोवर्धन म्हणाले कि ” अपोलो हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित आणि अनुभवी मेडिकल स्टाफ आणि किडनी प्रत्यारोपणानंतर रुग्णची घेण्यात येणारी काळजी यामुळे किडनी प्रत्यारोपण यशस्वी होण्याचा दर हा ९९% इतका आहे. डायलेसिस आणि प्रत्यारोपण यांची तुलना केल्यास रुग्णाला कमी किंवा जास्त कालावधीत अधिक चांगले आणि सर्वसामान्य जीवन जगता येते,त्याची दैनदिन कामे करता येतात. तसेच डायलिसिस पेक्षा किडनी प्रत्यारोपण केल्याने अधिक रुग्णांचे जीव वाचतात. किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत पण ही सुविधा नाशिक मध्येच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळया सुविधा नाशिक मध्येच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होते. अपोलो हॉस्पिटल्स नाशिकमध्ये उपलब्ध असलेले अदयावत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णांची घेण्यात येणारी काळजी यामुळे ७५ किडनी ट्रान्सप्लांटचा टप्पा यशस्वीपणे गाठणे शक्य झाले आहे.

अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित झा म्हणाले कि” अपोलो मध्ये असलेल्या अनुभवी,निष्णात डॉक्टरांची टीम,प्रशिक्षित नर्सिग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे आणि मेहनतीमुळे किडनी प्रत्यारोपण सारख्या मोठया आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वच्छता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते,रुगणाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची ही काळजी घेतली जाते. अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये अवघ्या ५ वर्षात ७५ रुग्णांचे यशस्वी पणे किडनी प्रत्यारोपण झाले आहे कि कौतुकाची बाब आहे.
यावेळी अपोलो हॉस्पिटल चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित झा, किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल,डॉ.प्रकाश उगले, युरोसर्जन डॉ.किशोर वाणी, डॉ.प्रवीण गोवर्धन, डॉ.नंदन विळेकर, जनरल सर्जन डॉ.मिलिंद शाह, हदय शस्त्रक्रिया तज्ञ,डॉ.अभयसिंग वालिया, भूल तज्ञ डॉ.चेतन भंडारे, भूपेश पराते,डॉ.अमिता टिपरे, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ.प्रवीण ताजणे, रेडिओलॉजिस्ट डॉ.हर्षल धोंगडे,वैदयकिय अधिक्षक डॉ.मितेश निकम अवयव, प्रत्यारोपण समन्वयक सौ.चारुशीला जाधव आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
Breaking News