“वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे वॉकथॉन २०२६” उत्साहात संपन्न

Jun 3, 2026

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “वर्ल्ड इमर्जन्सी मेडिसिन डे” निमित्त आयोजित करण्यात आलेली जनजागृतीपर “वॉकथॉन २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे संपन्न झाली.

आपत्कालीन वैद्यकीय सेवा, सार्वजनिक सुरक्षितता तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकथॉनमध्ये डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी डॉ. शुभांगी कांबळे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, प्राथमिक उपचाराचे महत्त्व तसेच तातडीच्या वैद्यकीय मदतीचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

तसेच डॉ. मानसी गुजराथी यांनी “Fat to Fit या विषयावर मार्गदर्शन करत निरोगी जीवनशैली, वाढते लठ्ठपण आणि त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती दिली. याच प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते किम्स मानवता हॉस्पिटलच्या “ओबेसिटी क्लिनिक” चे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान सहभागी नागरिकांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच किम्स मानवता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय करावे यावर आधारित पथनाट्य सादर केले. यामध्ये CPR (सीपीआर) चे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले, ज्यास उपस्थित नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी संगीतमय योगा ग्रुपच्या प्रणेत्या डॉ. मनीषा कापडणीस म्हणाल्या, “नियमित व्यायाम, योग आणि आरोग्याविषयी जागरूकता हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. अशा सामाजिक जनजागृती उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत गरज आहे.”

तसेच किम्स मानवता हॉस्पिटलचे सीओओ डॉ. स्वानंद कुलकर्णी म्हणाले, “आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी योग्य उपचार आणि नागरिकांची जागरूकता अनेक जीव वाचवू शकते. समाजामध्ये आपत्कालीन परीस्थिती विषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे.”

या कार्यक्रमास डॉ. मनीषा कापडणीस, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. रोहन देव, योगा प्रशिक्षक सविता सरडे, मा. नगरसेवक अरुण नाना काळे, मा. नगरसेवक संतोष गायकवाड, रामदास निकम, राजेंद्र धामणे, वैभव काळे, अनिल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News