८८ दिवसांचा खडतर लढा, अन्‌ शिशूला मिळाले नवजीवन ; साफल्‍य हॉस्‍पिटलचे अभूतपूर्व यश, २४ आठवड्याच्‍या बाळावर यशस्‍वी उपचार

Sep 15, 2025

नाशिक- सिन्नर येथील गर्भवती महिलेला सहाव्‍या महिन्‍यातच वेदना व्‍हायला सुरु झाल्‍याने मुदतीपूर्वीच प्रसुती करावी लागली. जन्‍मलेल्‍या अवघ्या ६९० ग्रॅम वजनाच्‍या शिशूची वैद्यकीय स्‍थिती नाजूक असताना, नाशिकच्‍या गंगापूर रोड येथील साफल्‍य हॉस्‍पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. तब्‍बल ८८ दिवस डॉक्‍टरांसह संपूर्ण टीमने उपचारासाठी परीश्रम घेत दिलेल्‍या लढ्याला यश आले असून, शिशूला नवजीवन मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर येथील गरोदर महिलेला सहा महिन्‍यांची अर्थात २४ आठवड्यांच्‍या गर्भवती महिलेला प्रचंड रक्‍तस्‍त्राव व वेदना सुरु झाल्‍या. स्‍थानिक पातळीवर परमसाई हॉस्‍पिटल येथे स्‍त्रीरोग व प्रसुतीशास्‍त्र तज्‍ज्ञ डॉ.वंदना खैरनार यांनी आपात्‍कालीन स्‍थितीत सिजेरीयन केले. व त्‍यांना चार रक्‍ताच्‍या पिशव्‍या देऊन, जन्‍मलेल्‍या नवजात अर्भकावर प्राथमिक उपचार डॉ. योगेश आव्हाड यांनी केले. व त्‍वरित नाशिक येथील बालरोग अतिदक्षता तज्‍ज्ञ डॉ. अमोल मुरकुटे यांच्‍याकडे साफल्‍य हॉस्‍पिटलच्‍या नवजात आयसीयुमध्ये हलविले.

चोवीसाव्‍या आठवड्यात प्रसुती होऊन बाळ सुखरुप घरी परतल्‍याची जागतिक पातळीवर अतिशय मोजकीच उदाहरणे आहेत. तरीदेखील डॉ.अमोल मुरकुटे आणि साफल्य हॉस्‍पिटलच्‍या टीमने आव्‍हान स्‍वीकारत शिवधनुष्य यशस्‍वीरित्‍या पेलले आहे. सुरुवातीचे १५ दिवस व्‍हेंटीलेटरवर व त्‍यानंतर १ महिना सीपॅपवर व नंतर १ महिना ऑक्‍सिजनवर बाळ राहिले. घरी परततांना बाळाचे वजन २ किलो २०० ग्रॅम झाले होते. साफल्‍य हॉस्‍पिटल एनआयसीयुमधील हा ८८ दिवसांचा खडतर प्रवास सांगताना डॉ.अमोल मुरकुटे म्‍हणाले, हा प्रवास प्रचंड चढ-उतारांचा होता. २४ व्‍या आठवड्यात जन्‍मलेल्‍या अर्भकावर उपचार करणे दिव्‍य गोष्ट होती. महाराष्ट्रात अशी उदाहरणे फारच मोजकी आहेत. तीही मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोंदविली आहेत. ८८ दिवसांच्‍या उपचारात टप्‍याटप्‍याने आधी फुफ्फुसांना वाढीसाठी मदत, नंतर हृदयाला, किडनीला मग आतड्यांना सपोर्ट दिला गेला. या संपूर्ण प्रवासात किंबहुना कुठल्‍याही एनआयसीयुमध्ये यश तेथील परिचारीकांच्‍या कठोर मेहनतीनेच मिळते. या प्रकरणामध्ये साफल्‍य एनआयसीयुच्‍या परिचारिका सरस्‍वती आणि मेरी व त्‍यांच्‍या संपूर्ण टीमने अथ्थक परीश्रम घेतले. हॉस्‍पिटल व्‍यवस्‍थापनात श्री. सोनवणे आणि डॉ.जगताप यांनी मदत करताना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून दिली.

साफल्य हॉस्पिटलचे नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. अमित पाटील म्हणाले, नाशिकमध्ये अशा प्रकारच्या गुंतागुंतीवर यशस्वी उपचार होणे कौतुकाची बाब आहे. सर्व आव्हानांना सामोरे जाताना बाळाला नवीन जीवन मिळाले आहे. डॉक्टरांसह संपूर्ण टीमने मेहेनत घेतली.
बाळाच्या वडिलांनी संपूर्ण टीम विषयी कृतज्ञता व्‍यक्‍त केली आहे. ते म्‍हणाले, साफल्‍य हॉस्‍पिटल यांच्‍या प्रत्‍येक सदस्‍याने घेतलेल्‍या काळजीमुळे बाळाला जीवनदान मिळाले आहे. यामध्ये डॉ.अमोल मुरकुटे यांच्‍यासह डॉ.दिनेश बोरसे, पॅथॉलॉजी तज्‍ज्ञ डॉ.महेंद्र राजोळे, बालनेत्रविकार तज्‍ज्ञ डॉ.अनुप शहा, आरएमओ डॉ. पूजा उगलमुगले, डॉ.शिवाजी जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

अशी होती उपचारातील आव्‍हाने..
* फक्त २४ आठवड्यांचे गर्भ
* वजन खूप कमी (फक्त ६९० ग्रॅम)
* खूप काळासाठी अत्यल्प प्‍लेटलेट्‌स
* किडनीच्‍या अपरिपक्‍वतेमुळे अतिप्रमाणात होणारे क्षार लिक
* एनईसी सारखा क्‍लिष्ट आजार- जो सदर बाळात शस्‍त्रक्रिया न करता बरा झाला.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News