घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

Jul 26, 2026

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान झाले. प्राथमिक स्‍तरावर असलेल्‍या या कॅन्‍सरवर एकाच वेळी बहुआयामी दृष्टीकोनातून (मल्‍टीडिसिप्‍लीनरी ॲप्रोच) उपचार करण्यात आले. एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर येथील तज्‍ज्ञ डॉक्‍टरांची टीम व कुशल कर्मचारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली यशस्‍वी उपचार करत ज्‍येष्ठ नागरिक रुग्‍णाला अवघ्या एका आठवड्यात डिस्‍चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. त्‍यामुळे कॅन्‍सरवर प्रभावी उपचार होत असल्‍याचा संदेश राज्‍य, देश व आंतरराष्ट्रीय स्‍तरापर्यंत पोहचला आहे, अशी माहिती एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर तसेच किम्स मानवता हॉस्पिटल्स आणि सिक्स सिग्माचे (नाशिक) व्‍यवस्‍थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांनी पत्रकार परीषदेत दिली.

अधिक माहिती देतांना डॉ. राज नगरकर म्‍हणाले, पुण्यातील बाळकृष्ण तुकाराम निगडे यांना एकाच वेळी तोंडाचा कर्करोग (डाव्या बाजूचा हिरड्यांचा भाग) आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग (सिग्मॉइड कोलन कॅन्सर) असे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कर्करोगाचे निदान झाले. ही परीस्‍थिती वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे आव्हान होती. उपचारासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि समन्वयाची आवश्यकता होती. रुग्णावर सुरुवातीला कोलन कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर त्यांच्या तोंडाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर एक आठवडा रुग्णालयात वैद्यकीय निगराणीखाली ठेवल्यानंतर त्यांना स्थिर अवस्थेत डिस्चार्ज देण्यात आला.

बायोप्सी रिपोर्ट, पीईटी-सीटी स्कॅन, इमेजिंग आणि कोलोनोस्कोपीच्या सखोल तपासणीनंतर दोन्ही कॅन्सरवर तातडीने उपचार करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील गुंतागुंत ओळखून, हे प्रकरण एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरच्या ‘मल्टिडिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड’समोर मांडण्यात आले. या बोर्डमध्ये सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, न्यूक्लियर मेडिसिन, ॲनेस्थेसियोलॉजी आणि क्रिटिकल केअरमधील तज्ज्ञांचा समावेश होता. या सर्व तज्ज्ञांनी एकत्रितपणे रुग्णाच्या स्थितीनुसार वैयक्‍तिक स्‍तरावर प्रभावी ठरेल अशी उपचार पद्धती (ट्रीटमेंट प्लॅन) निश्चित केली.

अधिक माहिती देतांना डॉ. राज नगरकर म्हणाले, “दोन वेगवेगळ्या कॅन्सरवर एकाच वेळी उपचार करण्यासाठी अनेक तज्ज्ञांमध्ये योग्य नियोजन आणि समन्वय असणे अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक कॅन्सरचा प्रकार वेगळा असतो. आणि त्यासाठी स्वतंत्र उपचार धोरण आखावे लागते. रुग्णाचे जीवनमान उत्तम राखण्यासाठी प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागतो. मल्टिडिसिप्लिनरी दृष्टिकोनामुळे आम्ही या रुग्णाच्या स्थितीला अनुरूप असा परिपूर्ण उपचार आराखडा तयार करू शकलो.”

एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमधील एकात्मिक कॅन्सर केअर मॉडेलमुळे रुग्णाचे निदान, उपचार आणि सपोर्टिव्ह केअर या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्या. प्रगत निदान सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे रुग्णाला सर्वसमावेशक उपचार देणे शक्य झाले. आजाराचे निदान झाल्यावर रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा भावनिक धक्का बसला होता. मात्र, डॉक्टरांच्या टीमने समुपदेशन, पारदर्शक संवाद आणि सततच्या पाठिंब्यामुळे त्यांना आधार दिला व त्यांचा हा प्रवास सुकर केला.
“सध्या कॅन्सरचे उपचार म्हणजे केवळ एखाद्या आजारावर उपचार करणे राहिलेले नाही, तर रुग्णावर सर्वसमावेशक उपचार करण्यावर भर दिला जातो. निदान प्रक्रियेतील प्रगती, मल्टिडिसिप्लिनरी केअर आणि पर्सनलाईज्ड ट्रिटमेंट प्लॅनिंगमुळे काही वर्षांपूर्वी अत्यंत कठीण वाटणारी गुंतागुंतीची प्रकरणे आता यशस्वीपणे हाताळता येत आहेत. लवकर निदान आणि योग्य वेळी तज्ज्ञांकडे संदर्भ हे रुग्णाचे प्राण वाचवण्यात आणि उपचारांचे चांगले परिणाम मिळवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावतात.”

एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर (HCGMCC) बद्दल:
डॉ. राज नगरकर यांनी २००७ मध्ये स्थापन केलेले एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर (HCGMCC) हे मध्य भारतातील पहिले एनएबीएच-मान्यताप्राप्त केंद्र आहे. ५४ हून अधिक सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट, ९०० कर्मचारी आणि २७५ बेड्सची क्षमता असलेले हे केंद्र सर्वसमावेशक कर्करोग उपचार देणारी आघाडीची संस्था आहे. सर्जिकल, रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये विशेष प्राविण्य असलेल्या या केंद्रात आतापर्यंत १,००,००० हून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत, ज्यात २,१०० हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे. रुग्णाभिमुख दृष्टिकोन आणि मल्टिडिसिप्लिनरी उपचार पद्धतीसाठी हे केंद्र ओळखले जाते. वैद्यकीय उत्कृष्टतेबरोबरच, कर्करोगमुक्त भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना रुग्णांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठीही हे केंद्र कटिबद्ध आहे.

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News