उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

Aug 27, 2026

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह ओपन हार्ट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर उत्तर महाराष्ट्रात प्रथमच अवघ्या २४ तासांच्या आत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रियाला Sinus Venosus Atrial Septal Defect (ASD) with Partial Anomalous Pulmonary Venous Connection (PAPVC) हा जन्मजात हृदयरोग होता. या आजारामध्ये हृदयातील वरच्या कप्प्यांमधील पडद्याला छिद्र असण्यासोबतच फुफ्फुसातून येणारी रक्तवाहिनी हृदयाला असामान्य ठिकाणी जोडलेली असते.
या आजारासाठी पारंपरिक पद्धतीने ओपन हार्ट सर्जरी करावी लागू शकते. मात्र, रियाच्या बाबतीत आधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय निवडण्यात आला. या प्रक्रियेत छातीचे मध्यवर्ती हाड म्हणजेच sternum (breastbone) कापण्यात आले नाही. छातीच्या उजव्या बाजूने दोन बरगड्यांच्या मधून छोट्या छेदाद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली.
या पद्धतीमुळे मोठी जखम टाळता आली असून लहान व कॉस्मेटिक व्रण, कमी वेदना, कमी रक्तस्राव, संसर्गाचा तुलनेने कमी धोका आणि जलद रिकव्हरी असे फायदे मिळतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर रियाची प्रकृती स्थिर राहिली आणि २४ तासांच्या आत तिला डिस्चार्ज देण्यात आला. बारावीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या रियासाठी ही जलद रिकव्हरी विशेष महत्त्वाची ठरली आहे.
याबाबत डॉ. प्रणव माळी यांनी सांगितले, “निवडक रुग्णांमध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानामुळे पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीच्या तुलनेत शस्त्रक्रियेनंतरचा त्रास कमी करण्यास आणि रुग्णाच्या रिकव्हरीला गती देण्यास मदत होते. रियाच्या बाबतीत शस्त्रक्रियेनंतरची तिची रिकव्हरी अत्यंत समाधानकारक झाली आणि वैद्यकीय निकषांनुसार २४ तासांच्या आत तिला घरी पाठवता आले.”

सेंटर हेड अनुप त्रिपाठी
अशोका मेडिकव्हरमध्ये आम्ही केवळ उपचार देण्यापेक्षा रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित उपचार अनुभव देण्यावर सातत्याने भर देत आहोत. रिया मोगलवरील ही शस्त्रक्रिया त्याचे उत्तम उदाहरण आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रणव माळी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शर्वरी – अॅनेस्थेसियोलॉजिस्ट, विवेक पॉल – परफ्युजनिस्ट, समाधान आणि विशाल – असिस्टंट्स, तसेच ICU टीम यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शस्त्रक्रियेपासून पोस्ट-ऑपरेटिव्ह केअरपर्यंत संपूर्ण टीमच्या समन्वयामुळे रियाची रिकव्हरी अत्यंत जलद आणि सुरळीत झाली.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णांसाठी प्रेरणादायी ट्रेकचे आयोजन

नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता...

read more
Breaking News