महान्यूओकॉन नाशिकॉन -2019 बालरोग तज्ञाची राज्यस्तरीय परिषद ११ ते 13 दरम्यान

Oct 10, 2019

नाशिक: उपचारपध्दतीत होणारे बदल.,नवे तंत्रज्ञान याची माहिती व्हावी तसेच यावरील  ज्ञानाचे आदानप्रदान होण्याच्या उद्देशाने बालरोगतज्ञांची राष्ट्रीय संघटना इंडीयन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या नाशिक शाखेतर्फे येत्या 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान “सुरक्षित भावी पिढी” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत महान्यूओकॉन नाशिकॉन -2019 या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ.संजय आहेर व परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ.पुरुषोत्तम देवी व डॉ मिलिंद भराडिया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. येथील हॉटेल एक्सप्रेस इन येथे आयोजित या परिषदेस नवजात शिशुतज्ञांची संस्था नॅशनल निओ नॅनोटॉलॉजी फोरम याचेही सहकार्य लाभले आहे. या परिषदेमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर परिसंवाद व मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
   ते पुढे म्हणाले कि, वैद्यकीय उपचार पद्धतीत अनेक सकारात्मक बदल  होत असून देशभरातील अनेक तज्ञ अनेक गुंतागुंतीचे यशस्वी उपचार करून रुग्णास जीवनदान देत आहेत. अशा परिषदांच्या निमित्ताने या तज्ञांच्या अनुभवाचा फायदा इतरांना देखील होतो. उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील विविध शहरातून सुमारे 45 तज्ञ या परिषदेसाठी नाशिकमध्ये येणार असून राज्यातील 600 हून अधिक बालरोगतज्ञ यात सहभागी होणार आहेत.
   गत 10 वर्षांपूर्वी भारतामध्ये प्रति हजारी 41 बालमृत्यू होत असत.त्यामध्ये नवजात शिशुंची संख्या अधिक असे.परंतु वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या सुधारणांमुळे सध्या हे प्रमाण दर हजारी 25 इतके आहे.यामधील नवजात शिशूंच्या मृत्युच्या कारणांमध्ये जंतुसंसर्ग हे प्रमुख कारण असून या परिषदेत यावरही एक सत्र ठेवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ.संजय आहेर यांनी दिली.
    परिषदेची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी होणार असून या दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये प्रसुतीगृहातील बाळाची काळजी, अत्यवस्थ नवजात शिशु, श्वासोच्छवासा दरम्यान येणाऱ्या अडचणी, नवजातामधील उद्भवणारे आजार यावर मार्गदर्शन करण्यात येईल. १२ ऑक्टोबर योजी या परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार असून याकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून भारतातील प्रख्यात नवजात शिशुतज्ञ प्रा. सिमीन इराणी या उपस्थित राहणार आहेत.
    भारतातील पहिली मानवी दुधाची बँक स्थापन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबईच्या डॉ जयश्री मोंडकर  या परिषदेमध्ये  लहान शहरात अशा प्रकारची बँक कशा प्रकारे सुरु करता येईल याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याव्यतिरिक्त नामवंत तज्ञ ॠशिकेष ठाकरे, डॉ वामन खांडीलकर, डॉ गोपीनाथ शिनॉय हे देखील विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. बाळाला घरी आणल्यानंतर महत्वाच्या असलेल्या कांगारू केअर याबाबतही या परिषदेदरम्यान माहिती देण्यात येणार आहे.
    हि परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ संगीता लोढा, डॉ सागर सोनावणे, डॉ प्रवीण काळे, डॉ संदिप पाटील, डॉ शाम चौधरी, डॉ रमाकांत पाटील, डॉ सुशील पारेख, डॉ कविश मेहता व डॉ अमित पाटील प्रयत्नशील आहेत.   

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News