आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर

Oct 11, 2019

नाशिक,दि.१० ऑक्टोबर:-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहे.

शुक्रवार दि ११ ऑक्टोबर रोजी डॉ. अमोल कोल्हे यांची आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी ११ वाजता नामपूर ता. बागलाण येथे सभा होणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ दिंडोरी येथे १२.३० वाजता सभा होणार आहे.          दुपारी ३ वाजता ऍड.माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ सिन्‍नर येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता   आ.पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ कळवाडी ता. मालेगाव येथे सभा होणार आहे.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेही उपस्थित असणार आहे. त्यानंतर तर रात्री ७.३० वाजता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ       येवला येथे जाहीर सभा होणार आहे.

दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रचारार्थ सकाळी ८ वा आडगांव, ८.३० वा पंचवटी कारंजा, ८.४५ वा नांदूर नाका, ९.०० वा सैलानी बाबा, ९.१५ वा बिटको चौक, ९.३० वा देवळाली गांव, यानंतर देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या प्रचारार्थ  सकाळी १० देवळाली कॅम्प, १०.३० वा भगूर, १०.४५ वा पाथर्डी तर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ सकाळी ११.०० वा जगताप वाडी, स्वारबाबा नगर, राजवाडा, सातपूर गाव, अंबिका स्वीट, कॉलनी सर्कल, आनंद छाया, मौले हॉल, सावरकर नगर, अशोक नगर पोलीस चौकी, भाजी मार्केट, नागरे चौक, विश्वास नगर, राधाकृष्ण नगर, हिंदी शाळा, महादेव मंदिर, गंगासागर नगर, हॉटेल पार्थ पॅलेस चौक पर्यंत रोड शो व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News