देवळालीत ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर ‘ टीए ’साठी भरती

Oct 12, 2019

देवळाली कॅम्प 
येथील लष्कराच्या टेरॉटोरियल थल सेना आर्मी ११६ इंफ्रट्री बटालियनमध्ये सोल्जर (सैनिक),क्लार्क व इतर सहा अशा ट्रेडसाठी ६३ जागांची भरती होणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन लष्करी आस्थापनाने केले आहे.
येथील आनंद रोड मैदानावर असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल व धोंडीरोडवरील टीए पॅराच्या मैदानावर ९ राज्यांसह ३ केंद्रशासित प्रदेशातील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकतील, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल स्टेनली जॉन यांनी पत्रकान्वये दिली आहे. ही भरती प्रक्रिया तीन प्रकारे होणार असून यामध्ये सोल्जर जीडी पदासाठी दि.३० रोजी महाराष्ट्र, ३१ रोजी राजस्थान, दि. १ नोव्हेंबर रोजी गुजरात, गोवा, दादरा व नगरहवेली, दमण व दीव, दि. २ रोजी आंध्र प्रदेश, तेलंगणा, दि ३ रोजी तामिळनाडू, लक्षद्विप व पाँडेचरी, दि. ४ रोजी कर्नाटक व केरळ, ट्रेडमन पदासाठी दि. ५ रोजी होणाऱ्या ५ पदांसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र कर्नाटक व राजस्थान तसेच दादरा व नगरहवेली, गोवा, दीव व दमण, लक्षद्विप व पाँडेचरी येथील युवकांना सहभागी होता येईल. यात धावणे, कागदपत्र तपासणी, वैद्यकीय व शारीरिक तपासणी केली जाणार आहे. तर दि. ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रांची फेरतपासणी, ट्रेड टेस्ट इतर तपासणी करून अंतिम यादी जाहीर केली जाईल. 
जीडी सोल्जर या पदासाठी दहावी उत्तीर्ण, क्लार्क पदासाठी बारावी उत्तीर्ण व इतर पदासाठी दहावी उत्तीर्णसह त्या विषयातील अनुभवाचा दाखला आवश्यक आहे. वैद्यकीय व शारीरिक पात्रता पार करणार्‍या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी ग्राह्य धरले जाईल. ही परीक्षा इंग्रजी व हिंदी माध्यमात ‘ऑब्जेक्टीव’ पद्धतीत होणार आहे. या परीक्षेत पात्रता धारकांना पुढील परीक्षेसाठी पाठविण्यात येईल.
 उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये 1 मैल धावणे, लांब उडी, पूल अप्स, झिगझॅग, बॅलन्स आदी प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी, शहीद मुलगा व मुलगा नसल्यास जावई यांना शारीरिक क्षमतेत उंची 2 सेमी, वजन 2 किलो, छाती 1 सेमी तर तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू उंचीमध्ये 3 सेमी, वजन 3 किलो, छाती 3 सेमी अशी सुट देण्यात आली आहे. उमेदवारांना सैन्यदलासाठीच्या शारीरिक क्षमता असणे बंधनकारक आहे,पात्र झालेल्या उमेदवारांची शारीरिक व वैद्यकीय चाचणी लेखी स्वरूपात देखील घेण्यात येईल या परीक्षेसाठी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये होतील.यामध्ये सामान्य ज्ञान,सामान्य विज्ञान,गणित,तर्क वितर्क तर क्लरिकल पदासाठी सामान्य ज्ञान,सामान्य विज्ञान गणित,संगणक विज्ञान व सामान्य इंग्रजी अशा विषयांवर लेखी परीक्षा घेण्यात येतील.
# सोबत आवश्यक कागदपत्रे
जन्म दाखला, शैक्षणिक, क्रीडा, रहिवासी दाखला, विवाहित अथवा अविवाहित असल्याचा पुरावा, 6 महिन्यापर्यंतचा चारित्र्य दाखला, जातीचे दाखले, पॅनकार्ड, आधारकार्ड, प्रतिज्ञापत्र यांसह सर्व शैक्षणिक पात्रता असलेले मार्कशीट, सर्व मुळ प्रमाणपत्र, झेरॉक्स व नुकतेच काढलेले 20 पासपोर्ट साईज फोटो, माजी सैनिक, शाहिद जवान व वीरपत्नीचे प्रमाणपत्र, शालेय व महाविद्यालयीन काळामधील खेळात मिळवलेले प्रमाणपत्रे भरतीसाठी येतांना सोबत आणावे.  
 

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News