सर्वच शहरात ह्यूमन मिल्क बँक गरजेची – डॉ .मोंडकर नाशिक मध्ये ह्यूमन मिल्क बँकेच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील – डॉ. आहेर

Oct 13, 2019

नाशिक – नवजात बालकाच्या वाढीसाठी व त्यांच्यातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आई चे दूध हे महत्वाचे असून काही कारणामुळे ज्या माता स्तनपान करू शकत नाही अश्या माता च्या बालकांसाठी ह्यूमन मिल्क बँक हे वरदान असल्याचे प्रतिपादन देशातील पहिली ह्यूमन मिल्क बँक स्थापनेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई तील सायन हॉस्पिटलच्या निवृत्त डीन डॉ जयश्री मोंडकर यांनी केले . त्या नाशिक मध्ये “सुरक्षित भावी पिढी” या मध्यवर्ती संकल्पनेवर आयोजित बालरोग तज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदे मध्ये बोलत होत्या .

नाशिक मधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे बालरोग तज्ज्ञ यांची राष्ट्रीय संस्था इंडियन अकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स तर्फे या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्यास नॅशनल निओनॅनोटोलॉजी फोरम चे सहकार्य लाभले आहे . या परिषदे मध्ये राज्यातील ६०० हून अधिक बालरोग तज्ञ सहभागी झाले आहेत.  डॉ.मोंडकर पुढे म्हणाल्या की या ह्यूमन मिल्क बँकेची सुरवात 1989 मध्ये करण्यात आली .त्याकाळी सायन हॉस्पिटल मधील नवजात शिशु साठी तेथीलच माता हे दूध देत असत. हे दूध देण्यासाठी माता स्वस्थ असणे आवश्यक असून त्याकरिता काही चाचण्या करण्यात येतात.त्यानंतर हे दूध पाशराईझ करण्यात येऊन ते उणे २५ या तापमानावर स्टोअर केले जाते. आंतरराष्ट्रीय मानका अनुसार योग्य रीतीने जमा करून साठवण केलेलं दूध हे ६ महिन्या पर्यंत वापरता येऊ शकते.जगात बाझिल या देशात २०० हून अधिक ह्यूमन मिल्क बँक असून आपल्या राज्यात १६ मिल्क बँक आहेत. जागृती मुळे अनेक माता स्वेच्छेने यात दूध देण्यासाठी पुढे येत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले . अश्या मिल्क बँक स्थापन करण्यासाठी २०१७ मध्ये शासनाने काही दिशा निर्देश दिले असून अत्यवस्थ नवजात शिशु चे प्रमाण बघता सर्वच शहरात याची आवश्यकता असल्याचेही त्या म्हणाल्या.इंडियन अकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय आहेर म्हणाले की संस्था अश्या प्रकारची ह्यूमन मिल्क बँक नाशिक मध्ये उभारण्यासाठी प्रयत्नशील असून आगामी कालावधीत या बाबत पाऊले उचलण्यात येत्तील .सोबतच या करिता जन जागृती करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.   या प्रसंगी उपस्थित नॅशनल निओनॅनोटोलॉजी फोरम चे राज्य अध्यक्ष डॉ.संदीप कदम म्हणाले की साठी अश्या परिषदेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक माहिती मिळ ते. ज्याचा उपयोग नवजात अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी होतो. संस्थे तर्फे आगामी परीषदा या लहान शहरात घेण्यात येतील असे त्यांनी नमूद केले. सदर परिषद यशस्वी करण्यासाठी परिषदेचे मुख्य समन्वयक डॉ.पुरुषोत्तम देवी व डॉ मिलिंद भराडिया तसेच डॉ संगीता लोढा, डॉ सागर सोनावणे, डॉ प्रवीण काळे, डॉ संदिप पाटील, डॉ शाम चौधरी, डॉ रमाकांत पाटील, डॉ सुशील पारेख, डॉ कविश मेहता व डॉ अमित पाटील प्रयत्नशील आहेत.     

 

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News