नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांची गुरुवारी (१७ ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्यातील सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात तर नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा व नाशिक पश्चिम विधानसभेतील उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली आहे.
सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी १२.३० वाजता पिंपळगाव बसवंत, दुपारी ३ वाजता नांदगाव येथे सभा होणार आहे. देवळाली विधानसभेतील उमेदवार सरोज अहिरे व नाशिक पुर्व विधानसभेतील उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा सायंकाळी ५ वाजता पंचवटी मधील मखमलाबाद येथे तर नाशिक पश्चिम विधानसभेतील उमेदवार डॉ.अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ७ वाजता सिडको येथील पवननगर येथे श्री.शरद पवार यांची सभा होणार असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी कळवले आहे.





