नाशिक – माहे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीचा सण येत आहे. बोनस प्रदान अधिनियम 1965 अंतर्गत कामगारांना सुधारीत दराप्रमाणे सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी बोनसची रक्कम देणे आवश्यक आहे. तथापि बोनसची रक्कम ही कारखाने, आस्थापना मालकांकडून दिवाळीच्या सणापूर्वी कामगारांना देण्याचा प्रघात पुर्वी पासून प्रचलित आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी कामगारांना कपडे व मिठाई खरेदी करणे शक्य होते. नाशिक विभागातील जिल्ह्यातील सर्व आस्थापना कारखाने मालकांना त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांना बोनस अधिनियमातंर्गत सुधारीत तरतुदीनुसार दिवाळीपूर्वी सुमारे 10 ते 12 दिवस आगोदर बोनसची रक्कम देण्याचे आवाहन, कामगार उप आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांच्याकडून करण्यात आले आहे.—–
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





