शहिद दिनानिमित्त श्रद्धांजली..

Oct 21, 2019

नाशिक : पोलीस हुतात्मा दिनानिमित्त नाशिक पोलिस कवायत मैदानावर झालेल्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, म.पो.अकादमी अधीक्षक श्रीमती अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक (निवडणुक निरीक्षक) योगेश चौधरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी, पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंग, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौधरी, विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी आदी अधिकाऱ्यांनी यांनी देखील पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
हिमालय बर्फाळ प्रदेशात 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी भारत-चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा जवानांच्या तुकडी वर चिनी सैनिकांनी अचानक हल्ला करत दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या दिवसाचे निमित्त साधून दरवर्षी पोलीस शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.
मागीलवर्षी भारतातील विविध दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. यावेळी शहिदांच्या कुटुंबीयांनी देखील पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
Breaking News