हा शाबरी मंत्र करा सिध्द लक्ष्मीपुजनाच्या रात्री ! होणार नाही समुध्‍दीची कमी , असे करा लक्ष्मीपूजन?

Oct 23, 2019

दिवाळीची रात्र ही सिध्द रात्र असल्यामुळे या काळात केलेले जप त्वरीत सिध्दी देणारे असतात अशा परिस्थिती सर्वांनी जर लक्ष्मीपूजना बरोबर जर त्याच रात्री दोन ते आडीच तास लक्ष्मीकारक शाबरी मंत्र जर जपमाळ घेऊन उत्तर दिशेला तोंड करुन, लाल आसन व वस्त्र परिधारन करावे, तुपाचा दिवा लावावे, तीन वेळा अंचमन करुन गोत्राचे उच्चार करावे, श्रीगणेश व भैरवदेवाला नमस्कार करुन सोबत या खालील मंत्राचे पठण केले तर देवी लक्ष्मीची कृपा जातकावर कायम राहते. मंत्र खालील प्रमाणे
1) श्री शुकले महा-शुकले कमल दल निवासे श्रीमहालक्ष्मी नमो नम: l
लक्ष्मी माई, सत्त की सवाई l
आओ, चेतो करो भलाई l
ना करो, तो सात समुद्रों की दुहाई l
ऋध्दि-सिध्दि खावोगी, तो नौ नाथ चौरासी सिध्दों की दुहाई l

दीपावली भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा उत्सव असून हया दिवशी केलेले लक्ष्मीपूजन सिध्दकारक असून घरात सुखशांती व समृध्दी वर्षभर निवास करते. सर्वात आश्चर्याचे म्हणजे या दिवशी अमावस्या असतांनाही देवी लक्ष्मी सगळीकडे विराजमान होण्यासाठी येते. परंतु अनेक ठिकाणी पूजा संपन्न करण्यासाठी गुरुजींची कमतरता असते हया मुळे शास्त्रो्क्त पूजा करणे शक्य होत नाही. सर्वांना शास्त्रोक्त पूजा करता यावी व केलेल्या पूजनाचा यशोचित फल प्राप्त व्हावे ही मनिषा अंगी ठेवून खालील पध्दतीने आपण लक्ष्मीपूजन करुन केलेली पूजनाची सर्व ऊर्जा जर देवी लक्ष्मीला अर्पण केली तर निश्चित भगवती आपल्या आयुष्यभर काही कमी ठेवणार नाही.

यंदाच्या लक्ष्मीपूजनाला हया साहित्याची करा खरेदी !
लक्ष्मीपूजनासाठी बहुतेक सामूग्री घरातच उपलब्ध असते परंतु काही वस्तू हया दुकानातून खरेदी करावेच लागतात. कोणत्या आहे त्या वस्तू जाणून घेऊया – लक्ष्मी-सरस्वती व गणपती बप्पाचे फोटो, हळद, कुंकू,तांदूळ,पान, सुपारी, लौंग, इलायची, गुग्गलधूप, पणती, तांबे किंवा चांदीचा दिवा, कापूस, नारळ, मध, दही, तिर्थ, गूळ, धने, फळे, फुले, जव, गहू, दूर्वा, चंदन, शेंदूर, गाईचे तुप, दूध, मेवा, बतीशे, जनेऊ, सफेद कोरा कपडा, आत्तर, चौरंग, ताब्यांचा कलश, कमल गटटेच्याची माळ, शंख, आसन, ताट, चांदीचा सिक्का, विविध फराळी वस्तू.

कशी करणार पूजा ?
लक्ष्मीपूजन करतांना सर्वात प्रथम चौरंगावर एक कोरे सफेद कापडा पसरुन त्यावर देवी लक्ष्मी, सरस्वती व गणपतीचा फोटो ठेवावा. त्यानंतर हातात छोटे पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणून फोटो ,पूजा साहित्य व स्वत:वर शिंपडणे मंत्र आहे

ऊँ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा l य: स्मरेत पुण्डरीकाक्षं स: वाहयाभंतर: शुचि:ll

हया नंतर जमिनीला स्पर्श करुन नमस्कार करुन पुढील मंत्र म्हणून आसनावर विराजमान व्हावे मंत्र आहे

पृथ्विति मंत्रस्य मेरुपृष्ठ: ग ऋषि: सुतलं छन्द: कूर्मोदेवता आसने विनियोग: ll
ऊँ पृथ्वी त्वया धृता लोका देवि त्वं विष्णुना धृता l त्वं च धारय मां देवि पवित्रं कुरु चासनम ll पृथिव्यै नम: आधारशक्ये नम: हे मंत्र म्हटल्यानंतर पुढे

ऊॅु केशवाय नम:, ऊँ नारायणाय नम:, ऊॅ माधवाय नम: म्हणत आचमन करावे. हयानंतर ध्यान व संकल्प करण्यासाठी डोळे बंद करुन लक्ष्मी देवीची प्रतिमा डोळयासमोर आणावी त्यानंतर हातात पाणी घेऊन लक्ष्मीपूजन करत असल्याचा संकल्प करावा. संकल्प करण्यासाठी हातात तांदूळ, फुल, पाणी व एक रुपयाचे नाणे घेऊन मी अमुक व्यक्ति अमुक स्थान व वेळेचे वर्णन करुन देवी लक्ष्मी, सरस्वती व गणपती यांची पूजा सुरु करीत आहे. शास्त्रानुसार मला याचा लाभ मिळो.
हया नंतर सर्वात प्रथम गणपती व गौरी पूजन करावे.त्यानंतर कलश पूजा करुन नवग्रहांचे पूजन करावे. हातात तांदूळ, फुल घेऊन नवग्रह स्तोत्राचे वाचन करावे. त्यानंतर भगवती षोडश मातृकांचे पूजन करावे.हया सगहया पूजना नंतर 16 मातृकांना गंध,अक्षत व फुले वाहून पूजा संपन्न करावी.यानंतर सर्व देवी-देवतांना गंध-अक्षत व फुले वाहून त्यांनतर देवी लक्ष्मीचे पूजन सुरु करावे.

देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त व कनकधारा स्त्रोतचे पाठ करावे
सगळयात पहिले गणपती, लक्ष्मीचे पूजन करावे. त्यांच्या फोटो समोर 7,11,21 या संख्येत पणती लवावी.देवीला आणलेले सर्व साहित्य क्रमश: अर्पण करावे.भगवतीला नैवदय श्रध्दापुर्वक अर्पण करुन त्यानंतर आरती करावी. श्रीसूक्त, लक्ष्मीसूक्त, व कनकधारा स्त्रोत म्हणावे.अशा प्रकारे केलेले लक्ष्मीपूजन ख्ररोखरच सर्वश्रेष्ठ ठरेल!
सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर क्षमा-प्रार्थना स्त्रोत म्हणून घरातील सर्व वडीलधारे व्यक्तिांचा आर्शिवाद घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दयाव्या.

अजून बातम्या वाचा..

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW  चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

धातूच्या गणेशमूर्तीला प्रथम पसंती देऊन जलप्रदूषण थांबूया ; WOW चा पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम

नाशिक : गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे. याच श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत WOW...

read more
आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध होमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Nashik : आर्ट ऑफ लिविंग व वैदिक धर्म संस्था नाशिक यांच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर...

read more
ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

ज्योतिर्लिंगांवरील आरती थेट बघण्याची संधी, केवळ जिओहॉटस्टारवर, २६ फेब्रुवारी रोजी

Nashik : महाशिवरात्री: द डिव्हाइन नाइट या १२ तासांच्या खास लाइव्ह स्ट्रीमद्वारे २६ फेब्रुवारी रोजी...

read more
“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

“‘श्रीमद् रामायण’ अशा प्रकारे बनवले आहे की ते मागच्या पिढीला तर आवडेलच पण तरुण पिढीला देखील सुसंबद्ध वाटेल” : अभिनेता सुजय रेऊ

Nashik : श्रीरामाचे जीवनचरित्र मांडणाऱ्या आणि सनातन मूल्ये व आजही संबद्ध असलेली शिकवण...

read more
Breaking News