नाशिक दि. २४ :- विधानसभेच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.सत्ताधारी भाजप-शिवसेना पक्षांपेक्षा जनतेने नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला स्वीकारले असल्याचे या निकालातून दिसत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्यात ६ आमदार निवडून आले आहेत. गेल्या वेळेपेक्षा २ आमदार जास्त निवडून आले असून काही उमेदवारांना कमी फरकाने पराभव पत्करावा लागला.जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून निकाल नम्रपणे स्वीकारत आहोत. जिल्ह्यातील आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन !
– अॅड. रविंद्रनाना पगार जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी





