महाराष्ट्र व हरियाणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा चुकीचा एक्झिट पोल दाखवून मतदारांची दिशाभूल करणाऱ्या सर्वेक्षण संस्थांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक मध्य विधानसभेचे अध्यक्ष किशोर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकी दरम्यान काही एक्झिट पोल संस्थांनी मतदारांचे सर्वेक्षण करून मतदांच्या दिवशी व निकालाआधी चुकीचा निर्णय दाखवून मतदारांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. विधानसभेच्या निवडणुका या लोकशाही मार्गाने व जनतेचे आवश्यक प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न करणार यावर निवडणूक लढवणे अपेक्षित असते. परंतु भाजपा पक्षाने प्रचारादरम्यान मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काही एक्झिट पोल संस्थांकडून फुगीव आकड्याचा पोल दाखविण्यात आल्यामुळे या एक्झिट पोल संस्थांविरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी कुणाल बोरसे, अनिल ठाकरे, दीपक शिंदे, संतोष धोंगडे, भुवनेश कडलग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






