शरद पवारांनी सांगितले पावसात भिजण्यामागचे गुपित !

Nov 2, 2019

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत सातारामधील सभेत शरद पवारांनी पावसात भाषण केले होते. सदरचे पावसातील भाषणाला संपुर्ण महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद मिळाला . याविषयाशी संबंधित युवा सिंगर या कार्यक्रमाचा महा अंतिम सोहळा हा ११ नोव्हेंबर ला रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवर प्रक्षेपित होईल. या कार्यक्रमाचे चित्रीकरण नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम शारदोत्सव मध्ये शरद पवारांच्या उपस्तिथीत पार पडला. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते. या कार्यक्रमाच्या एका ऍक्ट मध्ये राधिका पवार ह्या बालगायिकेने शरद पवारांना ५ असे प्रश्न विचारले की ज्यामुळे शरद पवारांनी सुद्धा तिला एक गुपित सांगितले.
बारामती मध्ये झालेल्या ” युवा सिंगर एक नंबर” या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात बाल गायिका राधिका पवारने निवेदिका मृण्मयी देशपांडे हीला सांगितले की आज मी सुद्धा निवेदन करणार आहे आणि आज मी शरद पवारांना काही प्रश्न विचारणार आहे. शरद पवारांनाही या गोष्टीला संमती दिली आणि राधिका सरळ पवार बसले होते तिथे जाऊन तिने त्यांना प्रश्न विचारायला सुरु केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचं नाव बरंच चर्चेत राहील होतं ते त्यांच्या झंझावाती प्रचार सभांमुळे. पाच दशकाहून अधिक काळ राजकीय प्रवास केलेले पवार किती हजर जबाबी आहेत आणि प्रत्येक वयातील प्रत्येकासोबत किती सहजतेने संवाद साधतात हे ” युवा सिंगर एक नंबर” च्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.


राधिकाच्या प्रश्नांचा ओघ हा या प्रचार सभांना घेऊनच होता. तिने पहिला प्रश्न विचारला की, ” तुमच्या पायाला एवढी मोठी दुखापत झाली असताना सुद्धा महाराष्ट्रात एवढ्या सभा तुम्ही कश्या घेतल्यात? ” यावर पवार म्हणाले,” मला कुणीतरी सांगितलं की मला हे जमणार नाही, तर ‘ मला हे जमणार नाही’ हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.” राधिका ने दुसरा प्रश्न विचारला “क्रिकेट जास्त आवडतं की कुस्ती?” यावर पवार म्हणाले, ” दोन्ही खेळ माझ्या तेवढेच जवळचे आहेत त्यामुळे हे सांगणं कठीण आहे.” त्यानंतर राधिकाने त्यांना तिसरा प्रश्न विचारला, ” शाळेत मला निबंध लिहिताना ” मी मुख्यमंत्री झाले तर या विषयावर तिला काय लिहायचं ते कळत नाही, तर यावर पवार तिला म्हणाले, ” तुम्ही आत्मविश्वासाने निबंधाची सुरुवातचं करायची ” हो… मी मुख्यमंत्री होणारच ” ” यावर सभागृहात एकंच हशा पिकला. तिने चौथा प्रश्न विचारला,” मला कविता छान करता येतात, पण तुम्ही इतकी छान भाषणं कशी काय देता हो? “यावर पवार मिश्कीलपणे म्हणाले ” मी भाषणं देऊ शकतो पण कविता काही करू शकत नाही, तिथे तुझी आणि माझी परिस्तिथी सारखीच!” आणि शेवटचा प्रश्न ज्यात पवारांनी त्यांचे गुपित सांगितले तो म्हणजे ” मी पावसात भिजायला गेले तर माझे आजोबा मला भरपूर रागवतात तर तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसं काय भाषण दिलं? राधिकाने विचारलेल्या या प्रश्नावर सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळेच पवारांकडे पाहू लागले. यावर पवार राधिका ला म्हणाले “पावसात भिजण्यामुळे, तुझे आजोबा जरी तुला रागावत असले, तरी मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला आणखी मते देऊन मतांचा पाऊस पाडला. यावर सभागृह टाळ्यांनी कडाडून निघाले. शरद पवारांचा हजर जबाबी पणा सर्वानाच खूप आवडला.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News