नाशिक,दि.४ नोव्हेंबर :- सिन्नरचे भूषण ज्येष्ठ नेते माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनाने एका मार्गदर्शकाला कायमचा मुकलो असल्याच्या शोकभावना नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
शोक संदेशात माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या खासदार पदाच्या कार्यकाळात काम करत असतांना ज्येष्ठ नेते सूर्यभान गडाख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांच्याकडे असलेल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. मनमिळाऊ,परखड व स्पष्टवक्तेपणा असलेल्या माजी गडाख यांनी आपली जीवन हे सामाजिक कार्यात झोकून दिलेले होते. त्यांच्या या कार्यातून नेहमीच प्रेरणा मिळत गेली आणि त्यामाध्यमातून जनतेचे प्रश्न यशस्वीपणे सोडविता आले. जनतेचे प्रश्न सोडविताना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन करत आपल्या पाठीवर हात ठेवत साथ दिली.
माजी आमदार सूर्यभान गडाख यांच्या निधनामुळे आपण एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला कायमचा मुकलो आहे. त्यांच्या निधनामुळे गडाख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंब त्यांच्या दुःखात सहभागी असून मी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे समीर भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे.





