केवळ नाशिकलाच होणार सुला फेस्ट ; फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात रंगणार महोत्सव !

Nov 13, 2019

नाशिक: जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असलेला ‘सुला फेस्ट’ हा संगीत महोत्सव 2020 मध्ये नाशिकला होणार की सुला विनियार्ड्सच्या बंगळुरू येथील प्रांगणात होईल याबाबत साऱ्यांचे लक्ष लागून होते. ही प्रतीक्षा आता संपली असून तेराव्या हंगामातील सुला फेस्ट हा संगीत महोत्सव नाशिकला होणार आहे. 1,2 फेब्रुवारी 2020 ला होणाऱ्या या महोत्सवाचे स्वरूप भव्य असण्यासोबत शाश्वत दृष्टिकोन रुजवला जाणार आहे.
दरम्यानच्या काळात नाशिकची जगभरात ओळख निर्माण करून देणारा सुलाफेस्ट महोत्सव नाशिकला होणार नाही, अशा काही अफवा ऐकायला येत होत्या. खरं तर या संगीत महोत्सवामुळे जगभरातील पर्यटक नाशिकला दाखल होत, येथील अर्थकारणाला चालना देत असतात. त्यामुळे अफवांना पूर्णविराम देतांना सुला विनियार्ड्स टीमने या महोत्सव नाशिक येथेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात सांगण्यात आले आहे की, या वर्षीच्या महोत्सवात इको-फ्रेंडली संकल्पना अवलंबण्यासोबत स्थानिक व्यावसायिक, एनजीओ ला पाठबळ उपलब्ध करून देण्याचा ध्यास आहे. प्रामुख्याने ऊर्जा संवर्धन करण्यासोबत सौर ऊर्जेचा प्रभावी वापर, कमीत कमी प्रिंटिंग अशा विविध उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
सुला विनियार्ड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष (हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स) मोनित ढवळे म्हणाले की स्थानिक व्यावसायिकांना पाठबळ देण्यासोबत यंत्रणेला सर्वोत्तपरी सहकार्य करण्याला आमचे प्राधान्य असणार आहे. 2007 पासून महोत्सवाच्या निमित्ताने छाटणी (हरवेस्ट) हंगाम उत्साहात साजरा केला जातो आहे.
दरवर्षी आलेल्या पाहुण्यांना अविस्मरणीय क्षणांची अनुभूती करून देतांना, सोबत सुला फेस्टच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील नामांकित कलावंतांचे या व्यासपीठावरून सादरीकरण होत असते. तसेच सहभागी संगीत प्रेमींचे वीकएंड अविस्मरणीय ठरत असते. यावर्षी महोत्सवात भारतातील पहिल्या ‘वाईन एक्सपीरियन्स झोन’चा अनुभव घेण्याची संधी मिळणार असून, या निमित्त वाईनभोवतीचे भरगच्च उपक्रम राबविले जाणार आहेत. या क्षेत्राच्या माध्यमातून सुला फेस्ट या भारतातील पहिल्या फूड आणि वाईन फेस्टिव्हलद्वारे वाईन जनजागृती, साक्षरता निर्माण करण्याविषयी प्रयत्न केले जाणार आहे.
दरवर्षी भव्य आणि सर्वोत्कृष्ट होत असलेल्या या महोत्सवात यंदा 2020 मध्ये मनोवेधक दृष्टीकोन जपला जाणार आहे. कलावंताच्या नावाची यादी लवकरच जारी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विनियार्ड्सच्या खुल्या प्रांगणात अँफिथिअटर येथे होणाऱ्या मनोरंजनाने भरपूर असलेल्या, दर्जेदार संगीत, वाईन, ड्रिंक्स, खाद्यपदार्थ, फॅशन आणि खरेदीचा आनंद घेण्यासाठी संगीतप्रेमींनी सज्ज होण्याचे आवाहन यावेळी केले आहे.

 

सुला विषयी…
भारतात वाईनसाठीची पहिली पसंती ‘सुला विनियार्डस्‌’ दिली जातेय. ‘सुला’च्या पुरस्कार प्राप्त वाईन्स देशभरातील नामांकित हॉटेल व रेस्टोरंट्‌समध्ये उपलब्ध आहेत. तसेच जगभरातील तब्बल 25 देशांमध्ये वाईनची निर्यातदेखील केली जाते आहे. 2005 मध्ये देशातील पहिले वाईन टेस्टींग रूम स्थापन करून वाईन टुरीझमच्या क्षेत्रात ‘सुला’ने मैलाचा दगड रोवला आहे. 2007 मध्ये ‘बियॉन्ड’ हे पहिले ‘विनियार्ड रिसॉर्ट’ तर 2017 मध्ये ‘द सोर्स’ हे देशातील पहिले हेरीटेज रिसॉर्ट साकारण्याचा बहुमान ‘सुला’ने पटकावलाय. गेल्या वर्षी सुमारे अडीच लाख व्यक्‍तींनी सुलाला भेट दिली होती. यातून सर्वाधिक व्यक्‍ती भेट देणाऱ्या जागतिक स्तरावरील वाईनरीजच्या यादीत सुलाने अव्वल स्थानी मजल मारली आहे.
सुलाने वाईन आणि स्पिरीट्‌स टुरीझमकरीता अत्यंत प्रतिष्ठेचा असा ड्रिक्‍स बिझनेस अवॉर्ड 2016 पुरस्कार पटकावलाय. विशेष म्हणजे ड्रिक्‍स बिझनेस पुरस्कार मिळविणारी सुला ही पहिली वाईनरी ठरली आहे. जुलै 2018 मध्ये सर्वाधिक दहा लाख (1 मिलीयन) वाईन विक्रीचा टप्पा गाठणारी सुला ही देशातील पहिली वाईन कंपनी ठरली आहे.
भारतीय वाईन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या सुलाकडून उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग राबवतांना द्राक्षाच्या उत्पादनात वैविध्यपूर्णता आणली जात असते. शाश्‍वत शेतीला प्राधान्य व ग्रामीण अर्थव्यवस्थेला या माध्यमातून बळकटी देण्याचे कार्य केले जात आहे. अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतांना प्राधान्य देतांना सुलातर्फे आवश्‍यकतेच्या निम्या क्षमतेची वीज निर्मिती सौर ऊर्जेतून केली जात आहे. म्हणूनच सुला जगातील शाश्‍वत वाईनरीज्‌मध्ये समाविष्ट झाली आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये सुलाने प्रथमच प्रीमियम वाईनरी अवगत केली आहे कर्नाटकमधील विनियार्डमध्ये निर्मिती काडू ही सुलाची धेय्याने प्रेरीत पहिलीच अशी वाईन आहे. देशातील वाघांचे संवर्धन असे धेय्य यामागील आहे.
वाईन आणि स्पिरीट आतातीच्या बाबतीतही कंपनीने आघाडी घेतली आहे. सुला सिलेक्‍शन्सच्या माध्यमातून जगविख्यात असे रेमी कॉईन्ट्रे, हार्डीज्‌, कोनो सुर, ले ग्रॅंड नोईर आदी ब्रॅंड्‌स याद्वारे मायदेशात उपलब्ध झालेले आहेत. सुलाफेस्ट हे जागतिक स्तरावरील संगीत महोत्सव म्हणून ओळखले जाऊ लागले असून आगामी फेब्रुवारी 2019 मध्ये फेस्टच्या बाराव्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे.

 

अजून बातम्या वाचा..

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमधील शस्‍त्रक्रियेने बांग्‍लादेशी युवकाला जीवनदान

नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्‍तरावर नावलौकिक मिळविलेल्‍या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरने...

read more
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये “नॉर्मोथर्मिक मॅन्युअल पर्फ्युजन” (NMP) तंत्राने किडनी प्रत्यारोपण

नाशिक : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे किडनी प्रत्यारोपण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय...

read more
अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

अत्याधुनिक मिसो रोबोटिक तंत्रज्ञानव्दारे जॉइंट रिप्लेसमेंट करणे झाले आणखी सोपे ;किम्स मनवता हॉस्पिटलमध्ये सिस्टीमचा शुभारंभ

नाशिक : किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिकने प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा...

read more
Breaking News