नाशिक :- गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रातील गिरणा प्रकल्पावरील जमादा डावा कालवा, जामदा उजवा कालवा व निम्नगिरणा कालव्याद्वारे व पांझण डावा कालवा यावरुन बोरी, अंजनी या मध्यम प्रकल्पावर तसेच खडकीसिम, वाघळा-1, वाघळा-2, पिंपरखेड, कुंझर-2, वलठाण, राजदेहरे, कृष्णापुरी ता.चाळीसगांव, पथराड ता.भडगांव बोळे, सावरखेडा, शिरसमणी, पिंपळकोठा-भालाणे, म्हसवा ता.पारोळा, आर्डी ता.अमळनेर मन्यारखेडा, विटानेर ता.जळगांव, खडकेसिम ता.एरंडोल, या लघु प्रकल्पावरुन कालवाप्रवाही, कालवा उपसा, जलाशय उपसा, तसेच लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन पाण्याचा लाभ घेण्याऱ्या सर्व लाभधारकांना आवाहन करण्यात येते तसेच हातगांव, ब्राम्हणशेवगा ता.चाळीसगांव व निसर्डी ता.अमळनेर या लघु प्रकल्पावरुन कालवाप्रवाही, कालवा उपसा, जलाशय उपसा व देवळी-भोरस ता.चाळीसगांव, कंकराज ता.अमळनेर, पदमालय ता.एरंडोल या लघु प्रकल्पावरुन जलाशय उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील अधिसुचित नदी, नाले, ओढे यावरुन पाण्याचा लाभ घेण्याऱ्या सर्व लाभधारकांना आवाहन करण्यात येते ,उपरोक्त प्रकल्पातील सिंचनासाठी पाणीसाठा उपलबध झालेल्या पाणीसाठ्यातून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळुन उर्वरित उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगाम 2019-20 मध्ये 15 ऑक्टोबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 या मुदतीत उभी पिके तसेच विहीरीवरुन तसेच अन्य मार्गाने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांना गहु, हरबरा, ज्वारी, दादर, मका, कडवळ, कपाशी सुर्यफुल करडई, भाजीपाला इ.हंगामी पिकांना सिंचनाच्या उपलब्धतेनुसार सिंचनासाठी मर्यादित पाणीपुरवठा करण्याचे कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता प्राप्त होईल असे गृहीत धरुन ठरविण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करुन पाणी मागणी करावी. लाभधारकांनी अटी व शर्तीचे नमुना नं.7, 7 अ व 7 बचे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज 30 नोव्हेंबर 2019 च्या आत पाटशाखेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने पाठविण्यात यावे असे आवाहन ध.ब.बेहेरे , कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव यांनी केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





