नाशिक – पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस हा बालदिवस म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लहान मुलांना खाऊचे वाटप केले. तपोवन मार्गावरील जीबिएस सेवाभावी संस्थेतील लहान मुलांना चॉकलेट व खाऊचे वाटप करून अंबादास खैरे यांनी लहान मुलांसोबत आनंदोत्सव साजरा केला. मुल म्हणजे देवाघरची फुल. पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुल व गुलाबाची फुल नेहमीच आवड म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त बालदिवस साजरा केला जात असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.
याप्रसंगी अॅड.चिन्मय गाढे, डॉ.संदीप चव्हाण, रेहान शेख, हिमांशू चव्हाण, सागर बेदरकर, रोहित जाधव, लाला जाधव, राज रंधावा, सागर तांबे, सागर पुरकर, जीबिएस सेवाभावी संस्थेतील गोसावी सर व सहकारी परिवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





