नाशिक : नाशिक महानगरपालिकेत उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागात उदयान निरीक्षक पदांसाठी मानधन पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.एकूण 6 पदे असून एकत्रित मासिक मानधन 25 हजार रुपये आहे. शैक्षणिक पात्रता बी.एस्सी कृषी अथवा बी.एस्सी उदयानविदया अथवा बी.एस्सी फॉरेस्ट्री, अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 25/11/2019 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : उदयान व वृक्ष प्राधिकरण विभाग, 3 रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड नाशिक, मुलाखतीचे ठिकाण : दिनांक 7 /12/2019 रोजी सकाळी 10 वाजता. अधिक माहिती www.nashikcorporation.in सा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...






