स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार ; पश्चिम महाराष्ट्राला मिळाले दुसरे क्रमांक

Nov 20, 2019

नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण’ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला आज केंद्रीय रसायने व खतेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने आज जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2019’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया , पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते.
उत्कृष्ट कार्याकरिता यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पश्चिम विभागामधून महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव तथा स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे प्रकल्प संचालक अभय महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्काराविषयी माहिती देताना स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचे राज्य समन्वयक गणेश वाडेकर यांनी सांगितले, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत घालून दिलेल्या विविध घटकांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात मुख्यत्वे राज्यातील 34 जिल्ह्यांतील निवडक एकूण 800 ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविणे, ऑनलाईन डाटा तयार करणे, सार्वजनिक स्थळांची केंद्र शासनाच्या पथकांकडून झालेल्या तपासणीत उत्तम कामगिरी, थर्ड पार्टी निरीक्षण यांसह प्रत्यक्ष जनतेसोबत व ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद आणि मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षणामध्ये उत्तम कामगिरीची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे श्री. वाडेकर यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News