रक्तविकारावर मात करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट प्रभावी उपचार : डॉ प्रितेश जुनागडे , लोटस हॉस्पिटल मध्ये ५० बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट यशस्वी ; उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव हॉस्पिटल

Nov 26, 2019

काय आहे बोन मॅरो ?
हाडांच्या आत असलेल्या पोकळीस बोनमॅरो अर्थात अस्थिमगज म्हणतात या पोकळीमध्ये रक्तातील मूलपेशी अर्थात स्टेमसेल्स असतात या स्टेमसेल किंवा मूलपेशींपासून रक्तात असणा-या तीन प्रकारच्या पेशींची निर्मिती होते, थोडक्यात रक्ताच्या निर्मितीसाठी या पेशी कारणीभूत असतात.या पेशींमुळे अस्थिमगजात अर्थात हाडांच्या पोकळीत तांबडयापेशी, रोगप्रतिकार करणा-या पांढ-या पेशी व रक्तबिंबीकां ची निर्मिती होते. कॅन्सर किंवा कर्करोगाची सुरुवात ही या अस्थिमगजातून अर्थात पोकळीतून होते तेव्हा प्रतिकार क्षमता आपोआप कमी होऊन प्रतिकार यंत्रणेत बिघाड होतो. तेव्हा हया कॅन्सर पेशी मूलपेशींच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण करतात परिणामी त्याचा प्रभाव रक्तनिर्मिती वर होऊन रक्तांच्या तांबडया,पांढ-या व प्लाजमा म्हणजे रक्तबिंबीका डिस्टब होतात.

हया मूलपेशी कोठे आढळतात?
लहान मुलांमध्ये सर्व हाडांच्या मध्यभागी तर मोठया व्यक्तींमध्ये मांडीचे हाड, कमरेचे मोठे हाड व बरगडया ,छातीचे पुढील हाड इ मध्ये असतात.

बोन मॅरो कोण देऊ शकतो?
बोन मॅरो केवळ व्यक्तीचे भाऊ किंवा बहिणच देऊ शकतात. शक्य नसल्यास आई किंवा वडील देऊ शकतात पण रुग्णाच्या शरीरास बोन मॅरोचे गुणधर्म जुळवून घेण्यास केवळ 50 टक्के लाभ मिळतो किंवा शक्यता फार क्वचित असते.

बोन मॅरो दिल्याने काही साईड इफेक्ट होतात का ?
बोन मॅरो म्हणजे हाडांच्या पोकळीमध्ये निर्माण होणारे रक्त निर्मितीचे मुळपेशी असते अर्थात रक्तदान केल्या सारखी एक प्रक्रिया आहे.रुग्णांस दात्याने दान केल्यास कोणताही साईड इफेक्ट होत नाही.

रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे रक्त रुग्णास देण्‍यास का टाळावे ?
एखादया रुग्णास जेव्हा रक्ताची गरज भासते त्यावेळेस अनेक रुग्णाचे नातेवाईक आपले स्वत:चे रक्त दान करुन रुग्णास देण्याचा हट़ट करतात. परंतु ते पुर्णत: टाळणे आवश्यक आहे. कारण भविष्यात त्या रुग्णास रक्ता संबधी अनेक गंभीर आजार बाळगण्याची भीती असते – डॉ.प्रितेश जुनागडे

नाशिक – परिवारात असलेली वैद्यकीय सेवेची परंपरा पुढे चालविण्यासाठी परदेशातील गलेलठ्ठ पगार, सुख सुविधा यांचा त्याग करून घेतलेल्या ज्ञान व अनुभवाचा उपयोग स्वदेशातील रुग्णांना व्हावा यासाठी २००८ पासून नाशिकमध्ये कार्यरत रक्तविकार तज्ञ डॉ प्रितेश जुनागडे यांच्या लोटस हॉस्पिटलने ५० बोन मॅरो प्रत्यारोपणाचा टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देतांना डॉ प्रितेश जुनागडे म्हणाले की, माझे पॅथॉलॉजिस्ट असणारे वडील डॉ सुभाष जुनागडे यांनी ४२ वर्षापूर्वी नाशिकमध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. ते उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच पॅथॉलॉजिस्ट. पण वैद्यकीय क्षेत्रात वेगळे काही करावे हि मनाशी खुणगाठ बांधून लंडन मध्ये रक्तविकार याबाबत प्रशिक्षण घेतले. २००८ मध्ये शिक्षण पूर्ण करून नाशिकला आल्यानंतर २०११ मध्ये लोटस इन्स्टिट्यूटची स्थापना केली. रक्तविकार म्हणजेच हिमोपिलीया, ल्युकोमिया, थायलसेमिया कॅन्सर, सिकलसेल अप्लास्टीक अॅनेमिया, लिम्फोमा, मल्टीपल मायानोमा, इम्यून डेफिसियन्सी डिसीज अशा रोगांवर उपचार करणे सुरु केले. सोबतच स्टेमसेल थिएरपी व बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट या उपचार पद्धतीही सुरु केल्या. अशा प्रकारचे उपचार करणारे लोटस हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव हॉस्पिटल आहे.
कोणत्याही व्यक्तींमध्ये रक्त तयार होण्यासाठी बोन मॅरो हा घटक महत्वाचा असतो. त्यामुळे रक्तविकारावर मात करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट हा प्रभावी ठरतो असे सांगून डॉ प्रितेश जुनागडे म्हणाले की, लोटस हॉस्पिटल मध्ये १३ महिन्यांपासून ते ७० वर्ष वय असलेल्या रुग्णांवर यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट करण्यात आले आहे असेही त्यानी नमूद केले.
रक्त विकाराचे उपचार हे खर्चिक असतात पण हे सामान्यांना शक्य व्हावे याकरिता जुनागडे हेल्थ फाउन्डेशनची स्थापना करण्यात आली असून या फाउन्डेशन मधून तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते.
मुंबई – पुण्याच्या तुलनेत या उपचारांसाठी नाशिकमध्ये कमी खर्च येत असून गेल्या काही वर्षांपासून नाशिकला रुग्ण येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News