AFH CLINICS सोडविणार रुग्णांच्या मनातील भीती ! निदानाबरोबर देणार समुपदेश व सेकण्ड ओपिनियन

Nov 27, 2019

जेष्ठ नागरिकांसाठी शुल्क रक्कमेवर विशेष सवलत : रुग्णांच्या इच्छेनुसार

नाशिक – आजच्या अत्याधुनिक जगात विशिष्ट रोगांचे निदान करण्यासाठी त्या-त्या रोगांवरील तज्ञ डॉक्टर उपलब्ध झालेले आहे. तरी हया धावत्या जगात वेळे आभावी व रुग्णांच्या वाढत्या गर्दी आभावी डॉक्टरांना रुग्णांशी समुपदेश करण्यासाठी,त्यांच्या मनातील शंका निसारण करण्यासाठी वेळ नसतो त्यामुळे त्या रुग्णांची मानसिकता त्या आजाराविषयी वाढते आणि आजाराचे योग्य निदान होण्याऐवजी तो आजार व्यापाक होतो. समुपदेशन व सेकण्ड ओपिनियन बरोबर निदान करण्यासाठी नाशिक मध्ये नावीन्य पुर्ण उपक्रम सुरु करण्‍यात आला आहे ज्यात रुग्णांची संपुर्ण प्राथामिक माहिती बरोबर आजाराचे कारणे, निदान व काळजी अशा सर्व गोष्टींचा विचार एकाच छताखाली करुन रुग्णाला समुपदेशा बरोबर सेकण्ड आोपिनियन नाशिकच्या AFH CLINICS मार्फत होणार आहे.

रुग्णांना चिंतीत करणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचे निराकरण करून त्यांना योग्य आरोग्य मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक शहरातील अनुभवी आणि प्रतिथयश डॉक्टरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या ए.एफ.एच क्लिनिक्स या संस्थेद्वारे आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण समुपदेशन सेवा लवकरच सुरु होत आहे अशी माहिती वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ .प्रशांत साठे यांनी दिली . या तज्ञा मध्ये वरिष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. शुभांगी साठे , डॉ. किरण राजोळे , डॉ. रत्ना अष्टेकर, डॉ. प्राजक्ता लेले, डॉ. शाम अष्टेकर व डॉ. अनिल थत्ते , माधवी भाभे यांचा समावेश आहे.
डॉ. प्रशांत साठे एक प्रतिथयश सर्जन म्हणून नाशिकमध्ये गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. तसेच सल्लागार म्हणून गेल्या दीड दशकात त्यांनी १०० हुन अधिक वैद्यकीय क्षेत्रातील प्रकल्पांना सहाय्य केले आहे. आपल्या प्रदीर्घ अनुभवात त्यांना आरोग्य क्षेत्रात एक गंभीर तूट सतत जाणवत होती ती म्हणजे रुग्णांसाठी योग्य आरोग्य / आजार, हया विषयी प्रबोधन तसेच समुपदेशनाची सोय उपलब्ध नव्हती. म्हणूनच ही नवीन संकल्पना त्यांनी नाशिकच्या रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे.
परदेशात हेल्थ एज्युकेटर ही स्वतंत्र व्यवस्था आहे पण आपल्या देशासाठी ही नवीन संकल्पना आहे.
रुग्णांना चिंतीत करणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होण्यास हा उपक्रम साहाय्यभूत ठरेल. रुग्णांना योग्य आरोग्य प्रबोधन करणे , त्यांना त्यांच्या आजाराविषयी संपूर्ण, शास्त्रोक्त मार्गदर्शन करणे तसेच आरोग्यविषयक समुपदेशन करणे हे ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. हे सर्व एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्पेशॅलिस्टतर्फे केले जाणार आहे अशी माहिती डॉ. प्रशांत साठे यांनी दिली .
या सेंटरमध्ये शल्य चिकित्सा, नेत्र चिकित्सा, स्त्री रोग आणि फॅमिली हेल्थ यासंबंधी विविध समस्यांविषयी दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक संपूर्ण माहिती तसेच विविध उपचार पर्यायांविषयक सकल मार्गदर्शन उपलब्ध असेल. परंतु अनेकदा कोणता आजार, कशामुळे झाला? तसेच याकरिता कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे? याची नेमकी माहिती रुग्णाला मिळाल्यास त्याला योग्य निर्णयासाठी कमालीची मदत होईल तसेच त्यांची कुठल्याही प्रकारे दिशाभूलही टळेल. तो उपचार घेत असलेल्या वैद्यकीय तज्ञाकडे वेळेच्या अभावामुळे तो रुग्णास व त्याच्या नातेवाईकास समुपदेशनासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तसेच गुगल वर उपलब्ध असलेल्या माहितीबाबत खात्री देता येऊ शकत नाही. त्यामुळेच हा उपक्रम रुग्णांसाठी आरोग्य मित्र ठरेल असा विश्वास डॉ. प्रशांत साठे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये सांगतांना डॉ प्रशांत साठे म्हणाले, समुपदेशन केलेल्या सर्वांची इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी (Electronics Health Records), वैयक्तिकृत सेवा यापद्धतीने करण्यात येणार असून त्यामुळे या दीर्घकाळ साठवल्या जाऊ शकतील आणि दूर अंतरावरील नातेवाईकांशी रुग्णाच्या संमतीने शेअर करता आल्याने रुग्ण व नातेवाईकांना आपल्या आप्तांच्या तब्येतीसंबंधी विचारपूस करून योग्य निष्कर्षाप्रत पोहोचता येईल. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेकण्ड ओपिनियन मुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना निर्णय प्रक्रिया करणे सोपे होऊ शकेल. त्याचबरोबर फॉलोअप ची सुविधाही उपयोगी ठरेल. रेफरल गाईडन्स मुळे उपचाराची योग्य ठिकाणे कळतील आणि रुग्णाचा वेळ आणि पैसे वाचू शकेल.

या समुपदेशन सेवेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार असून ६० वर्षाहून अधिक वयाच्या जेष्ठ नागरिकांसाठी या सुविधेचे शुल्क पूर्ण पणे ऐच्छिक आहे हे सुध्दा हया वैद्यकीय उपक्रमाचे वैशिष्ट्य असेल.
ही सेवा एम. बी. बी. एस. अथवा त्याहून अधिक शिक्षित डॉक्टरांकडूनच पुरविली जाणार असल्याने असून एनएबीएच च्या मानकानुरूप या सेवा असल्याने त्यांचा दर्जा उच्च असेल.
विशेषज्ञ सेवा, सेकंड ओपिनियन, आरोग्य शिक्षण आणि समुपदेशन सेवा – केवळ पूर्व नियोजित वेळे द्वारेच उपलब्ध असतील. गेल्या ३० वर्षातील अनुभवाच्या आधारावर आणि रुग्णांच्या आवश्यकतेतून या उपक्रमाची नितांत गरज आल्याचे लक्षात आल्यानंतर या उपक्रमाची सुरवात केली असून नाशिककरांना याचा मोठा लाभ होईल असे डॉ. प्रशांत साठे यांनी पुढे सांगितले.

कोठे करणार संपर्क ?
दुपारी 12.00 ते रात्री 8.00 पर्यंत या सेवा साठे हॉस्पिटल, वेदमंदिरासमोर, धामणकर कॉर्नर त्रिंबक रोड नाशिक येथे उपलब्ध असतील. Walk-in शॉर्ट सेशन कौन्सेलिंग सेवा ही सर्वांसाठी असेल तर लॉन्ग सेशन सेवा हि पूर्वनिर्धारित भेटीची वेळ घेतल्यासच उपलब्ध असेल. त्यासाठी ०२५३२५७५७८५ वर संपर्क करावा किंवा afhnashik@gmail.com वर मेल पाठवावा किंवा ९३७३९४०१७९ वर मेसेज करावा किंवा Whats app मेसेज करावा.

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ; नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News