राष्ट्रवादी भवनात महात्मा फुले यांना विन्रम अभिवादन

Nov 28, 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२९ व्या पुण्यतिथीनिमित्ताने राष्ट्रवादी भवन येथे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांनी महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले महात्मा फुले हे थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा व अस्पृश्य मुलांसाठी शाळा पुण्यातील भिडे वस्तीत उघडली. स्त्री व शुद्र यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी अविरतपणे केले. त्यामुळेच आज पतित स्त्रियांचा उध्दार तसेच अनाथ, अर्भक यांचे संरक्षण व संवधन यांचा शासनप्रणीत कार्यक्रम सुरु झालेला आहे. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले ते बालहत्या प्रतीबंधक गृहामध्ये बालकांची अनेक प्रकारे काळजी घेत. त्यांना मुल बाल नसल्यामुळे त्यांनी ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला. पुढे त्याला पोटाच्या मुलाप्रमाणे शिकवून डॉक्टर केले. शेतकऱ्यासाठी शेती मालाच्या उत्पादन खर्चावर आधारित बाजार भाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकऱ्यांचे दुख संपणार नाही हे महात्मा ज्योतिबानी लिहून ठेवले. समाजिक न्यायाची महत्मा ज्योतिबा फुलेंची पंचसूत्री आजही मार्गदर्शक आहे. अशा अष्टपैलू, सर्वगुण संपन्न, अभ्यासू, अशा महात्मा ज्योतिबा फुले यांना  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे विन्रम अभिवादन करतो.यावेळी शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे व शहर उपाध्यक्ष पद्माकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी केले.या प्रसंगी अंबादास खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, बालम पटेल, मुख्तार शेख, गौरव वाघ, अॅड.चिन्मय गाढे, अमोल वाजे, बाळासाहेब गीते, शंकर मोकळ, योगेश दिवे, मुजाहिद शेख,मनोहर कोरडे, प्रशांत वाघ, समाधान तिवडे, सुनील अहिरे, दादा कापडणीस, अनिल परदेशी, अरविंद सोनवणे, राजेंद्र शेळके, अॅड.संजय वझरे, नाना पवार, आबा आमले, मिलिंद पगारे, बाळासाहेब सोनवणे, दिलीप पाटील, संतोष भुजबळ, डॉ.संदीप चव्हाण, रेहान शेख, सुनिल घुगे, हिमांशू चव्हाण, अमोल नाईक, राहुल कमानकर, विक्रांत डहाळे, विनोद डोके, प्रकाश राऊत, करण आरोटे, सोमनाथ हांडोरे, श्रावण लांडे, आकाश पवार, राकेश गांगुर्डे, सोपान कडलग, विकास सोनवणे, गणेश सूर्यवंशी, स्वप्निल चुंभळे, नितीन सानप, प्रशांत नवले,अमोल तुपे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News