ज्ञानाची देवाण – घेवाण करण्यासाठी स्त्रीरोग तज्ञांची वार्षिक परिषद येत्या ३० नोहेंबर ते १ डिसेंबर रोजी

Nov 28, 2019

नाशिक – स्त्रीरोग तज्ञांची संघटना नाशिक ऑब्स्टेट्रीक व गायनॉलॉजीकल सोसायटी यांच्या तर्फे व डॉ वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने स्त्रीरोग तज्ञांची वार्षिक परिषद येत्या ३० नोहेंबर ते १ डिसेंबर रोजी होत असल्याची माहिती संयोजन समिती प्रमुख डॉ नलिनी बागुल यांनी दिली.   वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले बदल, नव्या उपचार पद्धती याबाबत माहिती होऊन ज्ञानाची देवाण – घेवाण करण्यासाठी अशा परिषदांचा उपयोग होतो असेही त्यांनी नमूद केले.   सुमारे ३०० हून अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार असून हि संस्था ४० वर्षांपासून कार्यरत आहे. या दोन दिवसीय परिषदेसाठी अनेक नामवंत तज्ञ मार्गदर्शन करणार असून त्यामध्ये पुण्याचे शैलेश पुणतांबेकर, मुंबईचे डॉ अजित विरकुड, नागपूरचे डॉ आशिष कुबडे यांचा समावेश आहे. वर्कशॉप, लाईव्ह ऑपरेशन, केस स्टडी अशा माध्यमातून हे तज्ञ मार्गदर्शन करतील अशी माहिती संयोजन सचिव डॉ किरण पाटोळे व डॉ उमेश मराठे यांनी दिली.   परिषदेच्या पहिल्या दिवशी तांत्रिक सेशन होणार असून परिषदेचे समारंभपूर्वक उद्घाटन खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील. वर्कशॉपचे उद्घाटन डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन प्रा. मृणाल पाटील यांच्या हस्ते होईल.  परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ निवेदिता पवार, डॉ विजयालक्ष्मी गणोरकर, डॉ रविंद्र शिवदे, डॉ जगदीश मालपाणी, डॉ रमेश देसले, डॉ अरुणा वानखेडे, सो सुचिता बच्छाव, डॉ रुमी पटेल, डॉ वर्ष लहाडे, डॉ कविता गाडेकर तसेच संयोजन समितीचे सर्व सदस्य कार्यरत आहेत.    

अजून बातम्या वाचा..

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये ‘फॅट टू फिट’ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक क्लिनिकचा शुभारंभ

नाशिक : वाढते लठ्ठपणाचे प्रमाण आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या विविध मेटाबॉलिक समस्यांच्या...

read more
जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

जागतिक हृदय दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कार्डियाक टीमची विशेष पत्रकार परिषद

नाशिक : हृदयविकाराबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक तपासणी आणि वेळेवर उपचारांचे महत्त्व नागरिकांपर्यंत...

read more
नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

नाशिकमध्ये ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान प्रतिष्ठित किडनी विकार तज्ज्ञांची परिषद; देशभरातील तज्ज्ञांचा सहभाग

42nd ISN West Zone Conference 2026 च्या माध्यमातून '360° Kidney Care'चा संदेश नाशिक : किडनीचा आजार...

read more
उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच! मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरीनंतर अवघ्या २४ तासांत रुग्णाला डिस्चार्ज

नाशिक : जन्मजात हृदयरोगाने त्रस्त असलेल्या १८ वर्षीय रिया मोगल हिच्यावर अशोका मेडिकव्हर...

read more
घरी घेऊन जा..घरीच सेवा करा ! उत्तर मिळाल्यानंतर ७८ वर्षीय पुण्याच्या वृध्द बाबांची झाली दोन अवयवांना झालेल्या कॅन्सर पासून मुक्तता ;   नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरमध्ये अल्‍पावधीत मिळाला डिस्चार्ज

नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : पुण्यातील ७८ वर्षीय रुग्णाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या कॅन्सरचे निदान...

read more
Breaking News