माजी उपमुख्यमंत्री छगनभुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने नाशकातसमर्थकांकडून जल्लोष

Nov 29, 2019

नाशिक :-  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबई शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज (दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजी) भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी समता परिषदेचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, नाशिक महानगरपालिकेच्या माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, संजय खैरनार, योगेश कमोद, मुक्तार शेख, शंकर मोकळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, समता परिषदेसह, समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल शिवतीर्थावर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त या सोहळ्यास उपस्थित होते. छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जल्लोष करण्यात आला. आज सकाळी समता परिषदेचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे यांच्यासह शेकडो समर्थकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच यावेळी एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा केला.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करतांना दिलीप खैरे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात छगन भुजबळ आणि कुटुंबीयांनी मोठा संघर्ष केला. भुजबळ कुटुंबियासाठी हा कालावधी अत्यंत कठीण होता. या कालावधीत महाराष्ट्र तसेच देशभरातील समर्थकांनी त्यांच्यासोबत राहत त्यांना पाठींबा दिला तसेच त्यासाठी लढा देखील उभारला होता. आज राज्यात नव्याने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातवरण असल्याचे सांगून अडचणीच्या काळात समर्थपणे साथ देणाऱ्या सर्व समर्थकांचे आभार मानले. यावेळी बोलतांना दिलीप खैरे यांचे डोळे आनंदअश्रूने पाणावले होते.

यावेळी डॉ. विष्णू अत्रे,  अमर वझरे, भालचंद्र भुजबळ, दिनेश कमोद, संदीप सोनवणे, स्वप्नील फुले, रामेश्वर साबळे, योगेश निसाळ, श्रीराम मंडळ, धीरज बच्छाव, प्रविण सांगळे, दादा कापडणीस, ज्ञानेश्वर महाजन, देवा खैरनार, बाळासाहेब गिते, नाना पवार, सचिन कळासरे, दत्तात्रय माळी, राजेंद्र भगत, अनिल परदेशी, चिन्मय गाडे, अजय पाटील, कैलास झगडे, पप्पू शिंदे, जितु जाधव, विनोद डोके, शरद मंडलिक, सत्यम सूर्यवंशी, प्रज्योत सुरवाडकर, आकाश कोकाटे, सुनिल सूर्यवंशी, विशाल डोके, संदिप दिघोळे, विलास वाघ, संतोष जेजुरकर, साहेबराव बनकर, दिलीप कातकाडे, गणेश गायधनी, किशोरी खैरनार, दीपा कमोद, संगीता गांगुर्डे, पुष्पा राठोड, सलमा शेख, रजनी चौरसया, संगीता सानप, पंचशीला वाघ, स्मिता चौधरी, सुनिता रोकडे, शकीला शेख, शादिन शेख, ऐश्वर्या पवार आदी उपस्थित होते.   

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News