नाशिक : ज्या जोडप्यांना लग्नाच्या अनेक वर्षानंतरही संतती प्राप्ती झालेली नाही अशा जोडप्यांना खात्रीशीर सल्ला व प्रबोधन मिळण्यासाठी सिंगापूर येथे ‘सर्वोत्तम टेस्ट ट्युब बेबी सेंटर’, दुबई येथे वर्ल्ड ग्रेटेस्ट ब्रॅण्ड पुरस्कार व नुकताच सिंगापूरमध्ये फास्टेट ग्रोईंग ब्रॅण्ड इन आयव्हीएफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व मागील 6 वर्षात १६००+ पेक्षा जास्त महिलांना मातृत्व सुखाचे स्वप्न साकार करणार्या नाशिक येथील डॉ. मळगांवकर्स प्रोजेनेसिस टेस्ट ट्युब बेबी सेंटरतर्फे नुकताच बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहीती प्रसिध्द वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दिली. ह्या वेळी ज्या पालकांना डॉ. मळगांवकर्स प्रोजेनेसिस टेस्ट ट्युब बेबी सेंटर येथे मातृत्व सुख प्राप्त झाले त्यांनी आपले अनुभव सांगितले. पहिल्याच सायकल मध्ये मातृत्व सुख प्राप्त झाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
यावेळी डॉ. मळगांवकर म्हणाले की, बाल दिन हा खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या शिफारशीवरुन 20 नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (14 नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये जन्मलेल्या बालकांबरोबर मोठ्या उत्साहात बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सोनाली मळगांवकर व हॉस्पीटल डॉक्टर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





